✍️ मिलिंद विठ्ठलराव वानखेडे
Covid-19 विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनुसार शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ मध्ये सर्वप्रथम शाळा बंद शिक्षण चालू हा उपक्रम सुरू केला. नंतर शासनाने २२ जुलै २०२० च्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना Online Education देण्याचे आदेशीत केले होते. १० नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती.
वर्ग प्रत्यक्ष सुरु होण्याआधी ब-याच शिक्षकांनी Online व जेथे Online शक्य नाही तेथे Offline किंवा दिक्षा अॅप व इतर साधनाचा वापर करून अध्यापन केले. या सर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे करावे? याबाबत सतत विचारणा होत होती. त्यानुसार शासकीय पत्रक व शासन आदेशानुसार खालील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
१) इयत्ता १ली ते ८ वी च्या मुल्यमापनाबाबत :-
इयत्ता १ली ते ८ वी चे जे विद्यार्थी Online व Offline शिक्षणास उपस्थित होते किंवा शाळेत उपस्थित होते. त्यांचे मुल्यमापन करताना संदर्भ क्र.१ च्या पत्रानुसार आकारिक मुल्यमापनाची किमान दोन साधन तंत्रे (तोंडी काम, उपक्रम, स्वाध्याय व इतर) वापरून त्याचे गुण लक्षात घेता मिळालेल्या एकूण गुणाचे १०० गुणांत रुपांतर करून श्रेणी देण्यात यावी
उदा. इयत्ता १ ली ते ८ वी साठी
तोंडी काम १० पैकी ७ गुण तर स्वाध्याय १० पैकी ९ गुण असे एकुण १६ गुण.
एकुण २० पैकी १६ गुण होतात. याचे १०० गुणात रूपांतर म्हणजे १०० पैकी ८० गुण होतात. ८० गुणासाठी असलेली श्रेणी ब-2 अशी येईल. याप्रमाणे प्रत्येक विषयासाठी श्रेणी देण्यात यावी.
२) वर्गोन्नत शेराविषयी :-
जे विद्यार्थी Online व Offline शिक्षण घेऊ शकले नाही किंवा स्थलांतरित झाले असतील अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. RTE Act २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा अशा नमुद करावा. (या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षात पुनर्भरण करावे लागेल)
३) हजेरी बाबद : इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे आवश्यक आहे. त्यामुळे हजेरी क्षमापीत आहे.
४)विशेष प्रशिक्षण: इयत्ता १ ली ते ८ वी चे जे विद्यार्थी क-२ पेक्षा कमी श्रेणी प्राप्त करतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना RTE Act नुसार वर्गोन्नत असा शेरा दिला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
५) मुल्यमापन:- इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारित व संकलित मुल्यमापन करण्यात येवू नये.
६) निकालपत्रक: - इयत्ता १ ली ते ८ वी च्या निकालपत्रकावर प्रथम सत्राच्या मुल्यमापनाबाबत कोविडमुळे निरंक असे लिहावे. व्दितीय सत्राच्या ठिकाणी मिळालेली श्रेणी लिहून व्दितीय सत्राऐवजी वार्षिक निकालपत्रक असे नमुद करावे.
७) इयत्ता ९ वी व ११ वीच्या मुल्यमापनाबाबत : - माध्यमिक शाळा संहिता नियम ३७ (३) व परिशिष्ट ७ (४) नुसार परिक्षा समिती स्थापन करावी. त्यानुसार मुल्यमापनाबाबत निर्णय घेण्यात यावा.
मुद्दा क्रमांक ७.१- यापूर्वी Online व Offline चाचणी घेतली असल्यास त्यात मिळालेल्या गुणाचे १०० गुणांत रुपांतर करावे.
मुद्दा क्रमांक ७.२ - चाचणी घेतली नसेल तर झालेल्या अध्यापनावर किंवा पूर्वज्ञानावर आधारित २० गुणांची चाचणी विद्यार्थ्यांना घरी सोडविण्याकरिता द्यावी. त्या उत्तरपत्रिका तपासुन मिळालेल्या गुणांचे १०० गुणात रूपांतर करून प्रचलित पध्दतीने निकालपत्रक तयार करावे
मुद्दा क्रमांक ७.३ :- वैकल्पिक विषयाचे मुल्यमापन नेहमीच्या पध्दतीने करावे व श्रेणी द्यावी.
८) निकालपत्रकाचे वाटप :- शारिरीक अंतर व कोविड -19 चे नियम पाळून निकालपत्रकाचे वाटप करावे
( टिप- मूल्यमापनाबाबदची सर्व माहिती शासकीय परिपत्रक, निर्णय याचा सखोल अभ्यास करून शिक्षकांना मूल्यमापन प्रक्रिया करतांना सुटसुटीत व्हावी या उद्दात हेतूने तयार करण्यात आली आहे)
संदर्भ - १) मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे पत्र शैसप्रपम/ मूल्यमापन / १ते८/ २०२१ दिनांक ८ एप्रिल २०२१
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण २०२१ / प्रक्र ६६/ एस डी ६ दिनांक ८ एप्रिल २०२१
वाचा:- १) बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९
२) शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय पीआरई/ २०१०/ (१३६/१०)प्राशि ५ दिनांक २० आॅगस्ट २०१०
३) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे पत्र दि १६ आॅगस्ट २०१९
✍️ मिलिंद विठ्ठलराव वानखेडे
माजी शिक्षण मंडळ सदस्य
संस्थापक अध्यक्ष - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघ)
9860214288, 9423640394
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा