पात्र ठरलेल्या प्राथ. माध्य. उच्च माध्य शाळा तथा वर्गतुकड्यांचा शासननिर्णय निर्गमित करण्याचा मार्ग


#मा. ना. अजितदादा पवारसाहेब तसेच #मा. ना. नासाहेब पटोले  यांच्या यशस्वी मध्यस्थीने मोकळा

--------------------------------------------

पात्र शाळांची यादी पुढील आठवड्यात तर पुरवणी सादर करत मुंबई व कोल्हापूर विभागतील एकूण पदांसाठी लागणारी संभाव्य वेतन तरतुदीची पुरवणी होणार सादर

------------------------------------------------------

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उध्दवजी ठाकरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार शालेय शिक्षणमंत्री मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड  यांचे विशेष आभार!

-----------------------------------------------

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले साहेब,मा.आ.अभिजितदादा वंजारी,मा.आ.किरणराव सरनाईक यांच्या पाठपुराव्याचे यश.

-----------------------------------------------

मुंबई दि.१७ जून २१:-

                 आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची १२,१५,२४ फेब्रुवारी २१ च्या शासननिर्णयाती त्रुटी/अपात्र तील शाळांना पात्र करून त्यांना येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी करणे कसे गरजेचे आहे हे पटवून देण्याचे काम नागपूर विभागाचे पदवीधर आमदार मा.आ.अभिजितदादा वंजारी  मा.आ.किरणराव सरनाईक आदींनी केले आहे.

महत्वाची बाब म्हणजे अर्थ विभागाने मुंबई व कोल्हापूर विभागातील शाळांना पात्र कसे घोषित केले याचा खुलासा सादर करावा,अन्यथा नवीन शाळांना पात्र ठरवू नये असा शेरा दिल्यामुळे अपात्र शाळा पात्र जिकरिचे होते परंतू मा.नानाभाऊ पटोले यांनी ही सर्व बाब मा.ना.अजितदादा पवार सो  यांच्यासह राज्याचे सन्माननीय मुख्यसचिव यांच्याशी फोनवरून संवाद साधत या शाळांना आत पात्र ठरवण्यासाठी अर्थ विभागाची गरज नाही असा मंत्रीमंडळात निर्णय,शासननिर्णय झाला असा खुलासा शालेयशिक्षण विभागाने दिल्याचे सांगितले.मा.ना.अजितदादा यांनी बैठकीत अर्थ विभागातील सचिवांना आदेशीत केले आहे. गेली तीन दिवसाच्या पाठपुराव्यानंतर आज त्या खुलाश्यावर मा.मुख्यमंत्री,त्यानंतर मा.उपमुख्यमंत्री यांची स्वाक्षरी होणे बाकी असून दरम्यानच्य वेळेत स्वाक्षरी होऊन पात्र शाळांचा शासननिर्णय निर्गमित होणार आहे.


काल केवळ याच विषयासाठी मा.अर्थमंत्री महोदय यांच्या दालनात सदरील विषयासंदर्भात शालेयशिक्षणमंत्री महोदया सह शिक्षणविभागातील सर्व सन्माननीय अधिकारी यांची बैठक पार पडली याच बैठकीत मा.ना.अर्थमंत्री यांनी पात्र यादी जाहीर करून त्यांची वेतन तरतुदीची फाईल दाखल करा असे सुचित केले आहे.


सोमवारी या शाळां पात्र ठरतील की नाही अशी परिस्थिती होती परंतू दोन दिवसाच्या या आमदार महोदयांनी पाठपुराव्याने सर्व चित्र बदलवले.उपरोक्त महोदय  मा.आमदार यांनी सदरील अपात्र /त्रुटीतील शाळांना पात्र ठरवण्यासाठी काल अर्थविभागाकडून जो खोडा घातला गेला होता तो दूर करण्यासाठी शर्थीने पाठपुरावा केल्याने हे सर्व शक्य होत आहे.महोदयांच्या प्रयत्नास आज अखेर यश आले असून पात्र शाळांचा शासननिर्णय आज सायंकाळपर्यंत निर्गमित करण्यात येणार असून पात्र शाळेसोबतच मुंबई,कोल्हापूर विभाग यासाठी वेतन तरतुदीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री यांनी मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्यासोबतची बैठक संपताच मा.ना.अजितदादांच्या दालनाबाहेर उपस्थित मा.आ.अभिजितदादा वंजारी,मा.आ.किरणराव सरनाईक,यांना सांगितले.यावेळी शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.


महाराष्ट्र विधानसभेचे मा.अध्यक्ष  काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे साहेब ,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब,राज्याचे शालेयशिक्षणमंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याची फोनवरून गेली दोन दिवस संपर्कात होते.


त्रुटीतील शाळा पात्र ठरणार असतील त्या फक्त मा.आ.अभिजितदादा वंजारी सो,मा.आ.किरणराव सरनाईक सो,मा.प्रकाशजी सोनवने यांच्यामुळे नाही तर हा हिवाळी अधिवेशनापर्यंत वाट बघायची वेळ आली असती.


कुठलेही काम फोनवरून पाठपुरावा केल्याने काम होत नाही हे प्रत्यक्ष अनुभवयास मिळाले आहे.शिक्षक समन्वय संघाच्यावतीने काल-आज केलेला पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला आहे.


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)



२ टिप्पण्या:

  1. ब्रहत आराखडा काँग्रेस सरकारने 2009 ला आणला त्याची अंमलबजावणी गुगल मॅपच्या साह्याने 2012 ला झाली 2014 ला ऑनलाईन प्रकिया पूर्ण झाली पण नवीन 2014 ला भाजप सरकार आले विनोद तावडे साहेबानी मनमानी करून हा जी आर रद्द केला तेव्हापासून या शाळाचा प्रश्न मार्गी लागत नाही माजी विनंती आहे कि सरकारने हा प्रश्न सोडवून शिक्षक ना न्याय द्यावा

    उत्तर द्याहटवा
  2. ब्रहत आराखडाला मंजूरी देऊन या शाळा अस्तित्वात आणा भाजप सरकार सारखे महाविकास आघाडी सरकाने निर्णय घेवू नयेत या शाळांना मान्यता दया

    उत्तर द्याहटवा