निकाल समिती रचना व कार्यपद्धती


शासन निर्णय दिनांक 28 मे नुसार इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्यासाठी

शाळास्तरावर निकाल समितीची स्थापना


📌प्रत्येक माध्यमिक शाळा त्यांच्या स्तरावर मुख्याध्यापकासह कमाल ०७ सदस्यांची निकाल समिती गठीत करेल . 

📌संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सदर समितीचे अध्यक्ष राहतील . 

तसेच विज्ञान , गणित , सामाजिक शास्त्र , भाषा या सर्व विषयांच्या शिक्षकांचा सदस्य म्हणून समावेश असेल . 

📌सदस्यांपैकी उपमुख्याध्यापक / पर्यवेक्षक / सेवाजेष्ठ शिक्षक समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील .


🎯 कार्यपद्धती🎯

 i . संबंधित विषय शिक्षक आपल्या विषयांचा वरील कार्यपद्धतीनुसार निकाल तयार करतील व सदर निकाल वर्गशिक्षकाकडे सादर करतील .

 ii. वर्गशिक्षक विषय शिक्षकांनी सादर केलेल्या विषयनिहाय गुणांचे व श्रेणीचे संकलन करून आपल्या वर्गाचा निकाल मंडळाने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून , शाळेच्या निकाल समितीकडे सादर करेल . 

ii . निकाल समिती वर्गशिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे परीक्षण व नियमन करून वरील कार्यपद्धतीनुसार अचूक असल्याची खात्री करून स्वाक्षरीसह दोन प्रतीत प्रमाणित करेल . 

iv . निकाल समितीने प्रमाणित केलेले गुण व श्रेणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संगणक प्रणालीत नोंदवाव्यात .

 v . निकाल समितीने अंतिम केलेल्या निकालपत्रकाची एक मूळ प्रत समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने शाळेत मुख्याध्यापकाच्या अभिरक्षेत ठेवण्यात येईल . 

vi . निकाल समितीने अंतिम केलेल्या निकालपत्रकाची दुसरी मूळ प्रत व इ.९ वीच्या विद्यार्थीनिहाय अंतिम निकालाची समितीने साक्षांकित प्रत सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे सादर करण्यात यावा .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा