दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलमापनाचे नियोजन ठरले; सोमवारी निघणार सविस्तर परिपञक, शाळांना आॕनलाईन पोर्टलवर माहिती भरता येणार
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे नियोजन ठरवले आहे. शाळास्तरावरील नववी, दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाआधारे विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असून शाळांना विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे एक वेगळे परिपत्रक सोमवारी जारी केले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनसंबंधीचा जीआर शिक्षण विभागाने जारी केला. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून शाळांना गुण द्यायचे आहेत. मात्र हे गुण देत असताना शाळांना कोणत्या प्रकारच्या तरतुदी आणि अधिकार द्यायची ही बाब शिल्लक होती.
त्याच पार्श्वभूमीवर नव्या तरतुदीसह सोमवारी शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणांसंदर्भात सविस्तर परिपत्रक निघणार आहे.
शिक्षण मंडळाकडून सुरू करण्यात येणाऱ्या पोर्टलवर शाळांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक गुणाची नोंद केली जाणार आहे. प्रत्येक शाळेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडून शाळांनी दिलेल्या गुणांची तपासणी केली जाणार आहे.
शिक्षकांना घरबसल्या मूल्यमापन करता येणार
शिक्षकांना पोर्टलवर घरबसल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती भरता येणार आहे. राज्यात दहावीचे शिक्षण देणाऱया 25 हजार शाळा असून दहावीच्या निकाल आणि त्यासंदर्भातील कामकाजासाठी तब्बल 8 हजार शिक्षक आणि इतर कर्मचारी लागण्याची शक्यता आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा