‘सीबीएसई’ने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ३०:३०:४० असे गुणसूत्र ठरवले


मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीचे धोरण निश्चित झाले असून, ‘सीबीएसई’ने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ३०:३०:४० असे गुणसूत्र ठरवले आहे. त्याच धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी, अकरावी या वर्गात मिळालेल्या गुणांचा अंतर्भाव या धोरणात करण्यात येणार असून, दहावीतील २०, अकरावीतील ४०, बारावीतील ४० गुण असे २०:४०:४० गुणांचे सूत्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(State Board of Education has fixed the policy of internal evaluation procedure for passing 12th standard students)विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयारी पूर्ण केल्याने मंगळवारी (ता. २९) हे धोरण शिक्षण विभाग जाहीर करणार असल्याचे समजते. सीबीएसईने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ३०:३०:४० असे गुणसूत्र ठरवले आहे. त्या धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी, अकरावी या वर्गात मिळालेल्या गुणांचा अंतर्भाव या धोरणात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा