विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षक बंधूंना काल आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा प्रमाण कसे असावे याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आर. टी.ई.कायद्यानुसार हे कशी असावी याची माहिती घेण्याबद्दल सूचित केलेले होते परंतु त्या अगोदर १५ व्या लेखातला उर्वरित भाग आज बघणार आहोत. यामध्ये सर्व प्रवर्गासाठी आरक्षण कशाप्रकारे ठेवावे याबाबत मार्गदर्शन माध्यमिक शाळासंहिता मध्ये करण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे-
सर्व प्रवर्गासाठी आरक्षण
(एक) महिला 30%(मुली)
(दोन) अपंग -अंध 01%
(तीन) अपंग -मूक बधीर 01%
(चार) अपंग -अस्थिव्यंग 01%
13.2 समुचित प्राधिकारी यांच्या शिफारशीने वर्षातील कोणत्याही वेळी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विहित केलेल्या संख्याहून अधिक झालेली असली तरी बदली झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि अथवा किंवा त्यांच्या पाल्यांना ते अन्यथा पात्र असल्यास आणि शाळेत आवश्यक तेवढी जागा व साधनसामग्री उपलब्ध असल्यास शाळेत प्रवेश देणे हे शाळेवर बंधनकारक राहील.
13.3 विशेष परिस्थितीत संचालकांना वरील पैकी कोणतीही अट शिथिल करून विहित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.
RTE कायद्यानुसार वर्गातील विद्यार्थी संख्या व शिक्षक मान्यता याबाबत पुढील अंकात माहिती घेऊया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा