2009 मध्ये 14 वर्षा खालील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे


 #क्रांतिकारक_कायदा....   1   

        

 2009 मध्ये 14 वर्षा खालील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे   

                                                       


                         

माहितीचा अधिकार, पर्यावरणाचा संदर्भातील नवे कायदे, स्त्री -पुरुष समता सिद्धीसाठी मुक्ती संबंधाने करण्यात आलेले नवे कायदे आणि आधुनिक मानवी जीवनाच्या समृद्धी व सुखासाठी तयार केलेले कायदे, या सर्वांचे मूल्य नवसमाजाचा विकास प्रक्रियेत निर्णायक ठरणार आहे. 

            या पार्श्वभूमीवर सक्तीचा मोफत शिक्षणाचा 2009 चा कायदा 14 वर्षाखालील बालकांचा सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कोणत्याही देशाची बालपिठी अज्ञानी, रोजी, असंस्कारित व विज्ञान मानवताविरोधी पर्यावरणात वाढली तर, त्या देशाचे भविष्य अंधारमय ठरणार 

         भारतीय राजकारणाने बालभारताच्या सक्षम व सुसंस्कारित शिक्षणाची नोंद घेऊन देशाचे भवितव्य सर्वार्थाने भक्कम करण्याचा पाया रचला आहे. 2009 चा मोफत शिक्षणाचा कायदा उपयुक्त असला तरी, त्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम हवी. शिक्षणाचा सुविधा व साधनसामुग्री जुळवाजुळव मुदतीत व्हावी. ती सर्वदूर आदिवासी पाड्यावर, डोंगर दरीत पोहचवणे आवश्यक. ही यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त असावी. यावरच शिक्षणाचा हक्काचे भवितव्य अवलंबून आहे. 


#विदर्भप्राथमिकशिक्षक_संघ 

#प्राथमिकामाध्यमिकवउच्चमाध्यमिकनागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा