देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लाॅकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षी प्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे .
कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे राज्यात देखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षी ही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती राज्यात कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून या वर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांचा फार मोठा दिलासा दिला आहे. सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021 - 22 साठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा