#क्रांतिकारक_कायदा.... 4
2009 मध्ये 14 वर्षा खालील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे
व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असून, अशा व्यक्तिस्वातंत्र्य आविष्काराचे अधिष्ठानच शिक्षणाचा अधिकार असल्याचे, तात्विक सूत्र, 1992 च्या सुप्रीम कोर्टाच्या मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य (1992) या प्रकरणाचा निकालपत्रातून पुढे आले. त्यानुसार घटनेतील कलम 21 नुसार 14 वर्षाचा आतील वयाचा मुलांसाठी मोफत शिक्षणाचा अधिकार हे शासनाचे घटनादत्त कर्तव्य असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने स्पष्ट केले. शिक्षणाचा अधिकार हा जीवन जगण्याचा अविष्कारासह व्यक्तिस्वातंत्र्याचा अविष्काराचाही अविभाज्य भाग असल्याचे मत याच निकालपत्राने स्पष्ट केले.
मानवांच्या प्रतिष्ठेला जीवन संग्रामात निर्णायक महत्व असतेच. पण या मानवी प्रतिष्ठेला शिक्षणाशिवाय मूलभूत सरंक्षण मिळणार नाही आणि शिक्षणासाठी देणगी घेतल्याने शिक्षणाचा मूलभूत अधिकारावर गदा येते. त्यामुळे शिक्षणाचा प्रवेशासाठी देणगी घेतल्याने घटनेच्या कलम 14 व 21 चे उल्लंघन होते, तसेच समतेचा व सामाजिक न्याय तत्वाचा गाभ्याला छेद जातो असा भावार्थ, या निकालाने जनमानसात पेरला.
जे. पी. उन्नकृष्णम विरुद्ध आंध्र राज्य (1993) या सुप्रीम कोर्टाचा पाच न्यायमूर्तींच्या पिठासमोर शिक्षण अधिकाराच्या प्रकरणात पुन्हा शिक्षण विषयक सूत्रांचा फेरविचार व चर्चा झाली. घटनेचा कलम 21 मधील व्यक्तीस्वातंत्राचा मुशीतूनच 14 वयोगटातील मुलांचा शिक्षण अधिकार आकारास येतो. म्हणून शिक्षणासाठी देणगीमूल्य घेणे, पैसे घेऊन शाळेत मुलांना प्रवेश देणे हे घटनाबाह्य आहे शिक्षणासाठी देणगी बेकायदा ठरवणारे हे निकालपत्र ऐतिहासिक म्हटले पाहिजे. अर्थात पैसे घेऊन अर्ध्या जागांवर प्रवेश देणे उर्वरित अर्ध्या जांगांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याचे सूत्र, या निकालपत्रातून आविष्कृत झाले . अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने देणगी घेऊन अर्ध्या जागांवर प्रवेश व उर्वरित अर्ध्या जागांवर गुणवत्तेचा आधारे प्रवेश देण्याचे धोरण मान्य केले, परंतु कोणत्याही खाजगी शिक्षण संस्थेला मोफत शिक्षण देण्याची सक्ती या निकालपत्राने केली नाही.........
#संदर्भ
#न्यायालयीन_मित्र
#विदर्भप्राथमिकशिक्षकसंघनागपूर
#प्राथमिकमाध्यमिकव_उच्चमाध्यमिक
कर कोणत्या विद्यार्थी ला RTE अंतर्गत admission दिली आणि त्याची TC नाही मिळाली तर त्याला शाळा सोडताना आपल्या शाळेची TC देत येते का? कृपया मार्गदर्शन करावे
उत्तर द्याहटवा