कोरोना च्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपाययोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास 81% पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास सहमती दर्शवली आहे राज्यातील तब्बल 5 लाख 25 हजार 88 पालकांनी यासाठी होकार दिला आहे तर राज्यातील 1 लाख 20 हजार 594 पालक अजून सुरक्षिततेच्या कारणास्तव मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. झालेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष आहे.
कोरोणामुक्त भागामध्ये शाळा सुरू कराव्यात का, यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एक राज्यव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील पालक आणि शिक्षकांची शाळा सुरू करण्याबाबत मते नोंदविली गेली. या सर्वेक्षणात सोमवारी रात्री 9 पर्यंत एकूण 6 लाख 45 हजार 682 पालकांनी मते नोंदविले ग्रामीण भागातील 2 लाख 87 हजार 578, तर शहरी भागातील 2 लाख 90 हजार 816 पालकांनी यात सहभाग घेतला. निम शहरी भागातील पालकांची संख्या 67 हजार 288 होती. तर ग्रामीण भागातील पालकांचा सहभाग 44.54 टक्के शहरी भागातील पालकांच्या 45.04 टक्के इतका सहभाग होता ग्रामीण भागात पालकांना इंटरनेट कनेक्शन, स्मार्टफोनसारखी संशोधनही अशा सुविधा परवडत नसल्याने त्यांच्या कल प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याकडे अधिक असल्याचे मत अभ्यासात व्यक्त करीत आहे आता या सर्वेक्षणावरून आणि पालकांच्या कल जाणून घेतल्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णयाकडे लक्ष आहे.
J051731
उत्तर द्याहटवा