विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)
माध्यमिक शाळा संहिता
विषयः शाळेत प्रवेश करणे आणि पटावरून कमी करणे | प्रवेश द्यावयाच्या विद्यार्थ्यांची संख्या
13.1) एखाद्या वर्गाच्या पहिल्या तुकडीत प्रवेश द्यावयाच्या विद्यार्थ्यांची कमाल संख्या 70 राहील. आणि प्रत्येक अतिरिक्त तुकड्यांमध्ये 50 विद्यार्थी असतील.
(अ) शाळाप्रमुख वर्गाच्या पहिल्या तुकडीमध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देईल आणि 50 वरील विद्यार्थ्यांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या (जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या अथवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्या किंवा मुलींच्या शाळेच्या बाबतीत कन्या शाळा निरीक्षकांच्या) पूर्वमंजुरीने प्रवेश देण्यात येईल.त्याचप्रमाणे शाळा प्रमुख (पहिली तुकडी सोडून)वर्गाच्या अतिरिक्त तुकड्यांमध्ये प्रत्येकी फक्त 45 विद्यार्थ्यांना प्रवेश देईल आणि 45 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थ्यांना वर नमूद केल्याप्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीने प्रवेश देईल
ब) या खोलीमध्ये वर्गाची बसण्याची सोय केली असेल तेथे प्रत्येक विद्यार्थ्यास किमान 07 चौरस फूट याप्रमाणे जितक्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिला असेल तेवढया विद्यार्थ्यांकरीता जागा असली पाहिजे.
क) शाळेने प्रत्येक वर्गातील एकूण जागांपैकी ५२%जागा खालीलप्रमाणे मागासवर्गीयांसाठी राखून ठेवल्या पाहिजेत.
खालील आदिवासी जिल्ह्यांचा संबंध असेल, तर अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खाली दिलेल्या जिल्ह्यासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे टक्केवारीनुसार शाळांनी जागा राखून ठेवाव्यात.
ठाणे 22 टक्के,नासिक 22 टक्के ,धुळे 22 टक्के, रायगड नऊ टक्के,यवतमाळ 14 टक्के, चंद्रपूर 15 टक्के,गडचिरोली 15 टक्के.
प्रकार राखून ठेवायचे जागांची
टक्केवारी
अनुसूचित जाती
व नवबौद्ध 13 टक्के
विनिर्दिष्ट क्षेत्राबाहेरील
अनुसूचित जमाती 07 टक्के
विमुक्त व भटक्या जमाती
विमुक्त जाती 03%
भटक्या जाती 2.5%
भटक्या जाती धनगर 3.5 %
वंजारी 02%
इतर मागासवर्गीय 19 %
विशेष मागास प्रवर्ग 02%
--------------------------------------------
RTE कायद्यानुसार वर्गात किती विद्यार्थी असावेत याबाबत सुधारणा केलेली आहे याबाबतीत आपण पुढील लेखात माहिती घेऊ या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा