शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट तुमच्या खात्यात
👇👇👇👇👇👇👇
शेतकरी बंधुंनो शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. तुमचा मुलगा शाळेत जात असेल आणि तो इयत्ता पहिली ते आठवीमध्ये असेल तर हा खास लेख तुमच्यासाठी आहे कारण आता इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोषण आहार न देता आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पोषण आहाराच्या बदल्यात पैसे जमा करण्यात येणार असून राष्ट्रीयकृत बँकेत खते उघडण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे.
*पोस्टातील खात्यातही अनुदान रक्कम जमा केली जाणार*
उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देता न आल्यामुळे अशा सर्व शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची अट होती. हि अट आता शिथिल करीत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक अथवा पोस्टातील खात्यातही अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून उन्हाळ्याच्या सुट्टीतील पस्तीस दिवसांची शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी केलेल्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. *तसेच सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक जोडलेल्या बँक खात्याची यादी नऊ जुलै पर्यंत तयार करण्याचे निर्देश होते.*
*शालेय पोषण आहार अनुदान रक्कम लवकरच मिळणार*
अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत बचत खाते नाहीत. शिक्षक संघटनांनी पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावीत किंवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षक शिक्षण उपसंचालकांना नवीन पत्र पाठवून आता विद्यार्थी-पालक संयुक्त खाते, पालकांची खाते अथवा विद्यार्थ्यांच्या खाते यापैकी कोणतेही खाते चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने आधार नोंदणी करून घेणे तो क्रमांक बँक खात्याशी जोडण्याची निर्देश दिले असून पोस्ट बँकेचे खाते पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे.
शालेय पोषण आहार अनुदान
खालीलप्रमाणे मिळणार शालेय पोषण आहार अनुदान
*इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना मिळणार १५६ रुपये
*सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळेल २३४ रुपये.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा