कोविड प्रोटोकॉलनुसार 'नवोदय' प्रवेश परीक्षा होणार; परीक्षेच्या तारखा जाहीर!


● नवोदय विद्यालय समिती, एनव्हीएसने JNVST २०२१ साठी ६ वीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. ● सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड प्रोटोकॉलनुसार, प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एनव्हीएसने स्पष्ट केले. यामध्ये एकूण २,४१,७००९ उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी ११, १८२ केंद्रांमध्ये ४७, ३२० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
● याबाबत शिक्षण मंत्रालयाने एका ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र २०२१-२२ च्या वर्ग-८ मधील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. दरम्यान, ही परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा