अकरावी CET ला एक महिना शिल्लक, कसा कराल अभ्यास ?


अकरावी प्रवेशासाठी सीईटी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. बरोबर एक महिना शिल्लक राहिला आहे. ही CET  ऐच्छिक  आहे .जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी CET परीक्षेचा पॅटर्न,  अभ्यासक्रम निश्चित झाला आहे. 

 अकरावी प्रवेशासाठी यंदा घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (Maharastra  FYJC cet 2021) 21 ऑगस्टला होणार आहे ही परीक्षा कशी असेल त्यासाठीचा अभ्यासक्रम (FYJC CET Syllabus) काय असेल यावर राज्य माध्यमिक मंडळाकडून सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्यांदाच ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यावर काही प्रमाणात दडपण आले असून ते कमी करण्यासाठी या परीक्षेची सविस्तर माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न.





 अशी होणार परीक्षा( (FYJC CET Exam Pattern)


 अकरावी प्रवेशासाठी आवश्यक CET 21 ऑगस्टला सकाळी 11 ते 1 या वेळेत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी विद्यार्थी रहात असलेल्या परीसराजवळील केंद्र देण्यात येणार असून त्या केंद्रात विद्यार्थ्यांच्या परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा एकूण 100 गुणांची होणार असून इंग्रजी, विज्ञान ,गणित आणि समाजशास्त्र या चार विषयांवर आधारित 100 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यासाठी राज्य माध्यमिक मंडळाकडून अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.


विषय प्रकरणे

 गणित (भाग 1 ) - दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणीत श्रेणी 

 गणित (भाग 2) - समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, निर्देशक भूमिती,  त्रिकोणामिती

 विज्ञान (भाग 1) -  गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्यांचे उपयोग, धातुविज्ञान ,कार्बनी संयुगे, अवकाश मोहिम

 विज्ञान (भाग 2 ) -  अनुवंशिकता व उत्क्रांती, सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 व भाग 2, पर्यावरणीय  व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने, प्राण्यांचे वर्गीकरण ,सूक्ष्मजीव शास्त्रांची ओळख ,पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान ,सामाजिक आरोग्य आपत्ती व्यवस्थापन 

समाजशास्त्र (भाग 1) -  प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन ,उपयोजित इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास कलाक्षेत्र आणि इतिहास पर्यटन आणि इतिहास ,इतिहास व  अन्य क्षेत्र, सामाजिक राजकीय चळवळी,संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया 

 समाजशास्त्र -भूगोल ( भाग 2)- स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, नैसर्गिक वनस्पती व प्राणी,  अर्थव्यवस्था व व्यवसाय, पर्यटन वाहतूक व संदेशवहन

 इंग्रजी - भाषा अभ्यास( व्याकरण सर्व भाग), इंग्रजी उताऱ्याचे आकलन(passage comprehensive) तसेच इंग्रजी कविता, लेखन कौशल्य 

अकरावी CET सात वेगवेगळ्या माध्यमातून देता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना संबंधित माध्यम निवडणे बंधनकारक असणार आहे. इंग्रजी, मराठी ,हिंदी ,गुजराती, तेलगू ,कन्नड ,सिंधी अशा भाषांचे पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येतील या भाषांतील प्रश्नावली विद्यार्थ्यांना देण्यात येईल जर विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजी माध्यम निवडले तर इंग्रजी विज्ञान आणि गणिताचे प्रश्न इंग्रजीत असतील तर समाजशास्त्राचे प्रश्न हे विद्यार्थ्यांनी निवडलेले निवडलेल्या भाषेत विचारले जातील.

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

६ टिप्पण्या: