पदोन्नतीसाठी दरवर्षी १ जानेवारीला ज्येष्ठता यादी जाहीर करणे बंधनकारक




☑️राज्य शासनाचे सर्व विभाग व त्याअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीचे लाभ मिळण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला ज्येष्ठता यादी जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.


☑️शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पदोन्नत्ती हा जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. पदोन्नत्ती ही सेवाज्येष्ठतेनुसार दिली जाते. परंतु वर्षांनुवर्षे ज्येष्ठता याद्याच तयार केल्या जात नाहीत. त्यासंबंधीच्या विहित कालावधीचे पालन केले जात नाही.


☑️ज्येष्ठता याद्या उशिरा तयार केल्या जातात, त्यातील त्रुटी दूर करण्यासही विलंब लावला जातो. याद्या अद्ययावत केल्या जात नाहीत. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नत्तीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, अशी सार्वत्रिक तक्रार असते. न्यायालयातही प्रकरणे जातात, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होतो.


☑️सेवाज्येष्ठतेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीचे लाभ मिळावेत, यासाठी सेवाज्येष्ठता निश्चित करणारी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१ या नावाने अधिसूचना जारी केली आहे.

👏👏👏👏👏👏👏

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा