जून महिन्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत धोरण आढावा घेताना या एन. ए. सी. एच.(NACH) प्रणाली साठी नविन नियम जाहीर केले आहेत.
आता पगार पेन्शन किंवा EMI बाबत सामान्य लोकांची मोठी समस्या दूर होणार आहे ह्या पूर्वी लोक त्यांच्या पगाराच्या किंवा पेन्शन येण्याचा दिवशी विचार करायचा की, त्या दिवशी बँकेची सुट्टी असू नये किंवा बँका बंद असू नये ,योगायोगाने, बँकेची सुट्टी आणि शनिवार-रविवार एकत्र आला तर पगारासाठी 3 दिवस वाट पाहावी लागते. परंतु आता असे होणार नाही. कारण कामकाजाच्या दिवसाव्यतिरिक्त देखील(Working Day) पगार, पेन्शन आणि EMI चे काही काम असेल तर ते करता येणार आहेत रिझर्व बँकेने यासाठी राष्ट्रीय संचलित क्लिअरिंग हाऊस (NACH)चे नियम बदलले आहे. त्यामुळे आता लोकांना पगारासाठी कामाच्या दिवसाची म्हणजेच Working day ची प्रतीक्षा करण्याची गरज लागत नाही. आता ही सुविधा आठवड्यातून सातही दिवस उपलब्ध असणार आहे. सध्या ही सेवा बँक उघड्या असताना सोमवार ते शुक्रवार पर्यंत उपलब्ध आहे .जून महिन्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पतधोरण आढावा घेताना या प्रणालीसाठी नवीन नियम जाहीर केले त्यांनी सांगितले होते की रिअल टाइम ग्राॅस सेटलमेंट (RTGS) अंतर्गत ग्राहकांना 24 तास, सातही दिवस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आठवड्यातील सर्व दिवस NACH सुरू ठेवण्यात येईल सध्या ही यंत्रणा फक्त बँकाच्या कामकाजाचा दिवसांवर म्हणजेच सोमवार ते शनिवार पर्यंत कार्य करते.Nach चा नवीन नियम 1 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल.
याचा काय परिणाम होईल ?
नाच ही एक बल पेमेंट सिस्टम आहे. ज्यात ब-याच लोकांना एकाच वेळी पगार किंवा पेन्शन दिली जाते. ही प्रणाली नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)चालवते. सरकारी संस्था (NPCI) अनेक प्रकारचे पत्र हस्तांतरण देखील करते.
लाभांश, व्याज, पगार आणि पेन्शन ची कामे देखील ती करते. या व्यतिरिक्त वीज बील ,टेलीफोन बील, पाणी बिल ,कर्ज EMI, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक, विमा प्रीमियम भरणे यासारखे कामेही Nach अंतर्गत येतात. आतापर्यंत ही सर्व कामे फक्त बँकाच्या कामकाजाचा दिवशी करण्यात येत आहेत परंतु आता ही सर्व कामे आठवड्याच्या शेवटी किंवा शनिवार-रविवार असला तरी करता येईल. यामुळे लोकांना फायदा होईल.
दररोज व्यवहार शक्य
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या रूपात NACH हा एक महत्त्वपूर्ण डिजिटल मोड म्हणून उदयास आला आहे. असे RBI ने म्हटले आहे या अंतर्गत आता लोक काही तासांचे काम अगदी काही सेकंदात करतात.
पूर्वी जे काम बँकेच्या शाखा किंवा सरकारी कार्यालयात जाऊन करायला लागायचे परंतु तेच काम आता घरी बसून चुटकीसरशी केले जातात यासाठी आपल्या मोबाइल फोन किंवा आपल्या कम्प्युटरची गरज लागते आता मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे मोठी कामे सहज केली जातात.
त्याचप्रमाणे डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित करण्यासाठी NACH सर्वात शक्तिशाली माध्यम म्हणून उदयास आले आहे. तेथे बटन दाबा आणि लाखो लोकांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करा.
कोरोना काळात सरकारने यांची मदत घेतली आहे .यावरूनच सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते.
ECS पेक्षा NACH वैगळे आहे
पगार देण्याचे काम हे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिगं सिस्टमव्दारे ( ECS) केले जाते. परंतु आता NACH त्याचा जागी कार्य करेल.NACH हा एक ECS चा प्रगत प्रकार किंवा तंत्रज्ञान आहे. NACH हे ECS पेक्षा जलद आणि सादरीकरणासह देय देण्यास सक्षम आहे. NACH बेबेटो आणि NACH क्रेडिट एकञ काम करतील. डेबिटचा उपयोग बिल देयकासाठी केला जाईल.तर क्रेडिट वापर पगार, लाभांश आणि व्याज वितरणासाठी केला जाईल.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा