मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश | माध्यमिक शाळा संहिता school Admission


 *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)


*माध्यमिक शाळा संहिता*




शिक्षक बंधू आणि भगिनींनो आत्तापर्यंत आपण  लेखांमधून विविध

नियमांची माहिती घेतली आहे आता आपण.


अठराव्या लेखातून खालील विषयावर माहिती घेणार आहोत .

      *विषय प्रवेश नाकारणे*


१४. कोणत्याही विद्यार्थ्यास तो केवळ विशिष्ट जातीचा,जमातीचा किंवा धर्माचा आहे याच कारणावरून कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही.

**************************

       *प्रवेशाकरिता अर्ज*

१५.विद्यार्थी अज्ञान असेल

तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याच्या आई-वडिलांनी किंवा पालकांनी प्रवेशाकरिता अर्ज शाळेच्या प्रमुखाकडे केला पाहिजे विद्यार्थी सज्ञान असेल तर त्याने स्वतः अर्ज केला पाहिजे.

**************************

आई-वडीलांना

अथवा पालकांना शाळेचे नियम पुरविणे

१६.विद्यार्थ्यास प्रवेश देण्यापूर्वी, विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांस किंवा पालकांस शाळेच्या नियमाची प्रत पुरवली गेली पाहिजे. त्या नियमांमध्ये आकारली जाणारी फी आणि शिस्तीचे विविध नियम यांचा समावेश असला पाहिजे. नियमांचे पालन केले जाईल असे संमतीपत्र आई-वडिलांकडून किंवा पालकांकडून घेतले पाहिजे.


**************************


*शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सादर करणे.*


१७.विद्यार्थ्यांनी पूर्वी तो जात असलेल्या मान्यताप्राप्त शाळेचे  ती शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेने त्यास प्रवेश देता कामा नये.


शासनाने विहित केलेल्या शाळा सोडल्याबाबत दाखल्याच्या प्रमाणपत्राचा नमुना परिशिष्ट 4 मध्ये दिलेला आहे.

परंतु आता

आर. टी. ई.कायद्यानुसार नवीन नमुना दिलेला आहे तो यापूर्वी शाळांना पाठवण्यात आलेला आहे त्यानुसार शाळेच्या दाखल्याची व शाळेच्या जनरल रजिस्टरची रचना केलेली आहे.

जर विद्यार्थ्यांने

यापूर्वी अशा कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला नव्हता या कारणावरून जर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखल केले नसेल तर विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांकडून किंवा पालकांकडून तशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र घेतले पाहिजे.


*टीपःआर.टी.ई.कायद्यानुसार व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्यांस शाळा सोडल्याचा दाखला नसल्याच्या कारणाने प्रवेश नाकारता येणार नाही.पालकांचे साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र घेऊन संबंधित प्राधिकारी यांच्या परवानगीने प्रवेश द्यावा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा