माध्यमिक शाळा संहिता | वर्गातील विद्यार्थी संख्या व शिक्षक मान्यता


शिक्षक बंधूंनो सोळाव्या लेखांमध्ये आपण वर्गातील विद्यार्थी संख्या आरक्षणनिहाय  कशी असावी याबाबतीत माहिती घेतली. विद्यार्थी संख्या एका वर्गामध्ये म्हणजेच तुकडीमध्ये किती विद्यार्थी संख्या आरक्षणनिहाय कशी असावी याबाबत संहितेनुसार १५ व  १६ व्या लेखामध्ये मार्गदर्शन केलेले होते.

आर. टी.ई.कायद्यानुसार तुकडी पध्दत  बंद झालेली असून विद्यार्थी संख्यानिहाय वर्ग उपलब्ध असावेत असे सुचित करुन या बाबतीत मार्गदर्शन केलेले आहे.त्यानुसारच शिक्षकांची संख्या देखील निश्चित केली जाते त्यालाच आपण संचमान्यता असे देखील म्हणतो आता वर्गातील विद्यार्थी संख्या आरक्षण निहाय कशी असावी या बाबतीत कोणतीही अडचण येता कामा नाही.फक्त दिलेल्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात त्या त्या इयत्तांच्या विद्यार्थी संख्यानुसार ५२% आरक्षण असावे.५२% आरक्षण विभागणी मागील दोन्ही लेखांमध्ये दिलेली आहेच, तशीच विभागणी व सामाजिक आरक्षण RTE कायद्याने दिलेले आहे.



तुकडी पद्धत बंद झालेली असल्याने  विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मंजूर होणाऱ्या शिक्षकास अध्यापनसाठी वर्गखोली उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे शाळा पोर्टल मध्ये इमारत या टॕबमध्ये वर्ग खोल्यांची संख्या उपलब्ध आहे तेवढ्या प्रमाणात वर्गखोल्यांची नोंद विद्यार्थीसंख्यानिहाय करावी. एका वर्गामध्ये किती विद्यार्थी संख्या असावी व त्यानुसार शिक्षक पद कसे मंजूर होतात ते खालीलप्रमाणे दिलेले आहे

१) १ली ते ५ साठी 30 विद्यार्थी संख्येस ०१ शिक्षक व त्यापुढे प्रत्येक 30 विद्यार्थ्यां पाठीमागे एक अतिरिक्त शिक्षक  मंजूर होईल,परंतु मंजूर होणाऱ्या शिक्षकांस अध्यापन करण्यासाठी  वर्गखोली उपलब्ध असली पाहिजे परंतु  विद्यार्थी संख्या दहा शिक्षकांपेक्षा जास्त शिक्षक मंजूर  होणारी असली तरी १० शिक्षकांपेक्षा जास्त शिक्षक मंजूर केले जाणार नाहीत हे लक्षात घ्यावे.

१ली ते ५ वी च्या एकत्रित विद्यार्थी संख्येवर शिक्षकपद मंजूर केले जाते हे लक्षात घ्यावे.तसेच  वर्गात कमीत कमी २० विद्यार्थी असतील तर ०१ शिक्षकपद मंजूर केले जाईल. २०पेक्षा विद्यार्थी संख्या कमी असल्यास/झाल्यास ०१ शिक्षक अतिरिक्त(कमी)होईल. १ली ते ०५वी साठी १२वी डी.एड.शिक्षकच नेमण्यात येतात.


2) ६वी ते ८वी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 35 विद्यार्थ्यांसाठी ०१ शिक्षकपद मंजूर करण्यात येईल. व त्यापुढे वाढ होणाऱ्या 35 विद्यार्थ्यांपाठीमागे ०१ शिक्षक अतिरिक्त मंजूर करण्यात येईल,म्हणजेच ०६वी ते ०८वी या वर्गातील विद्यार्थी संख्या यांची बेरीज करून  येणाऱ्या बेरजेस 35 भाग दिल्यास जे उत्तर येईल. तेवढे शिक्षक संचमान्यतेत मंजूर करण्यात येतील.

या संवर्गात डी.एड+पदवीधर/बी.एड शिक्षक अहर्ताधारक नेमावे लागतात. त्याचप्रमाणे कला व खेळ शिक्षकांची गणना या संवर्गात केली जाते हेही लक्षात घ्यावे.


3) इयत्ता ९वी १०वीच्या वर्गामध्ये ४० विद्यार्थीपाठीमागे ०१ शिक्षक मंजूर होईल तसेच पुढील वाढ होणाऱ्या प्रत्येक 40 विद्यार्थ्यांसाठी  एक अतिरिक्त शिक्षक मंजूर होईल. जर पहिल्या वर्षी इयत्ता नववीचा वर्ग असेल आणि विद्यार्थी संख्या कमीत कमी 20 असेल तरी त्यावेळी ०३ शिक्षक मंजूर होतील पण विद्यार्थीसंख्या कोणत्याही वर्गाची(५वी ते १०वी)20 पेक्षा कमी असेल तर  शिक्षक मंजूर केला जाणार नाही अथवा एक शिक्षक अतिरिक्त ठरेल.

माध्यमिक स्तर हा फक्त नववी, दहावीसाठी गणण्यात आलेला आहे.

 या संवर्गात बी.एड. अहर्ताधारकच शिक्षक समाविष्ट केले जातात अथवा नेमणूक केली जाते.


ज्या शाळेत तीन पेक्षा अधिक शिक्षक पदे मंजूर असतील तर पुढीलप्रमाणे विषय निहाय शिक्षक उपलब्ध ठेवणे हे मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे ते खालीलप्रमाणे उपलब्ध ठेवावे.

इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, मराठी, शारीरिक शिक्षण, कला अथवा कार्यानुभव इ.  याप्रमाणे विषयांच्या गरजेनुसार  व कार्यभार यांचा समतोल ठेवून शिक्षक उपलब्ध ठेवावेत.


शासनाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ ची संचमान्यता ही मूळ संचमान्यता गृहित मानलेली आहे व यावर्षाच्या संचमान्यतेत मंजूर असलेल्या शिक्षकपदांत विद्यार्थी संख्येत वाढ झाली तरी जादा शिक्षक मंजूर केले जात नाही.


टीपः तुकडी पद्धत बंद झालेली आहे तसेच आपल्या शाळेत एकच वर्ग असेल तरी आपणास इंग्रजी माध्यमाचा वर्ग शासन निर्णय दिनांकः१९ जून २०१३ नुसार सुरू करता येतो. त्याच प्रमाणे ज्या ज्या प्राथमिक शाळांमध्ये जून २०१३ पासून सेमी इंग्रजी माध्यमातून अध्यापन सुरू केलेले असेल ते विद्यार्थी जून २०१८ पासून माध्यमिक शाळांमध्ये प्रवेशित झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी नैसर्गिक वाढ या प्रमाणे प्रस्ताव सादर करून अथवा सेमी इंग्रजी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.



विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

२ टिप्पण्या:

  1. ज्या शाळांमध्ये इयत्ता 5वी ते10 वी आहे.अश्या शाळांमध्ये ईयत्ता5वी ते 8वी साठी किती शिक्षक नेमायचे व ते कसे नेमायचे...

    उत्तर द्याहटवा
  2. माध्यमिक शाळा पट संख्या वर आधारित शिक्षक GR आहे का

    उत्तर द्याहटवा