TET परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक जारी | फाॅर्म भरणे व परीक्षा संदर्भात माहिती




महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (MAHA TET - 2021) ही परीक्षा रविवार दिनांक १० आॅक्टोंबर २०२१ रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. तसे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता १ ली ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी च्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, माहिती व सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

🔵आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ आॅगस्ट २०२१ ते २५ आॅगस्ट २०२१ पर्यंत आहे.

🔵 प्रवेशपत्र आॅनलाईन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबर २०२१ ते १० आॅक्टोंबर २०२१ पर्यंत आहे.

🔵 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 1 दिनांक व वेळ

१० आॅक्टोंबर २०२१ सकाळी १०.३० ते १.०० वाजता पर्यंत

🔵शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 2 दिनांक व वेळ

१० आॅक्टोंबर २०२१ सकाळी २.०० ते ४.३० वाजता पर्यंत


शासनातर्फे आगामी काळात शिक्षकांच्या ४० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा नुकतीच शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे हि परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीची सुवर्णसंधी गेल्या अनेक वर्षांनंतर डीएड, बिएड उत्तीर्ण उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करून लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षक नेते व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. याच वेबसाईटवर TET परीक्षा संदर्भात व अभ्यासक्रमासंदर्भात अधिकाधिक माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा