शिक्षक पात्रतेसाठी महाटीईटी परीक्षा 10 ऑक्टोबरला


नागपूर दि. 11 : शिक्षक पात्रतेसाठी महाटीईटी -2021 ची परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे  यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.

इयत्ता 1 ली ते 5 वी व इयत्ता 6 वी 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित या शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एचटीटीपीएस कोलन हॅश महाटीईटी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येईल.

25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येईल. शिक्षक पात्रता परीक्षा एक हा पेपर 10 ऑक्टोबरला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. तर दुसरा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत राहील. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामन वंजारी यांनी कळविले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा