महापालिका क्षेत्र अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर


  अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांच्या संकेतस्थळावरून त्यांना कोणते कॉलेज अलॉट झाले त्याची माहिती मिळवता येईल. शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.



कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट ऑफ संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. यावेळी त्यांनी विभागवार अकरावी नोंदणीची आणि अर्ज स्वीकारल्याची आकडेवारी जाहीर केली. FYJC गुणवत्ता यादी या फेरीत जाहीर केली जाईल तसेच नवीन अर्ज स्वीकारले जातील. सोबतच पुढे आणखी तीन फेऱ्या देखील होणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटनुसार, ‘प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे. MMR हे मुंबई महानगर क्षेत्र आहे.’

https://mumbai.11thadmission.org.in/Public/Home.aspx

 प्रवेशाची गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर विद्यार्थांना कागदपत्रे आणि शुल्क जमा करून २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या यादीसाठी कॉलेजांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची माहिती ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

11th Admission Timetable

  • भाग एक भरणे : १४ ते २२ ऑगस्ट
  • भाग एक व दोन भरणे : १७ ते २२ ऑगस्ट
  • प्रवेशाची गुणवत्ता यादी : २७ ऑगस्ट
  • प्रवेश घेणे : २७ ते ३० ऑगस्ट
  • प्रवेशाची दुसरी फेरी : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
  • प्रवेशाची तिसरी फेरी : ५ ते ११ सप्टेंबर
  • प्रवेशाची चौथी फेरी : १२ ते १७ सप्टेंबर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा