कोविडच्या काळात शिक्षकांनी केलेले कार्य अतुलनीय : बबनराव तायवाडे





कोविडच्या काळात शिक्षकांनी केलेले कार्य अतुलनीय
- बबनराव तायवाडे यांच्या कडून कौतुक
- कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्काराचे वितरण

नागपूर - कोविड काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवत शिक्षकांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. शिक्षकांच्या कार्याचे विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने केलेले कौतुक व्याख्यानासारखे आहे, असे मनोगत महाज्योतीचे संचालक श्री बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.
आज रविभवनात (ता २३) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार - २०२१ चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाज्योतीचे संचालक व राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉ बबनराव तायवाडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर आमदार अॅड अभिजित वंजारी, शिक्षण महर्षी श्री खुशालराव पाहुणे, संघर्ष वाहिनीचे संघटक श्री दिनानाथ वाघमारे, शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते.
कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार - २०२१ मध्ये *अंगणवाडी गटातून* सौ सुगंधा मारुती कचरे (मुंबई), *प्राथमिक गटातून* श्री खुशाल किसन डोंगरवार (पिंपळगाव जि. भंडारा), श्री सुनील रुषीजी हटवार, (पारडी (ठवरे) जि. चंद्रपूर), श्री देवेंद्र जगन्नाथ लांजेवार, ( धानोरा जि. गडचिरोली), श्री एकनाथ विश्वनाथ पवार (उमरेड जि नागपूर), सौ उमा सुधीर कुकडपवार (महानगरपालिका) चंद्रपूर, श्री सागर आनंदराव आत्राम (आंबेशिवणी जि गडचिरोली), *माध्यमिक गटातून* श्री रविंद्र आनंद सपकाळे, (मुंबई), श्रीमती वसुंधरा वामन किटकुले (धोटे)
( कुही जि नागपूर), डॉ ज्योतिमणी राॅक, (धंतोली नागपूर), श्री ओंकार दशरथ राठोड (दारव्हा जि. यवतमाळ) *उच्च माध्यमिक गटातून* प्रा डॉ मच्छिंद्रनाथ दिनकरराव नागरे (करमाळा जि सोलापूर), श्री सुनील आनंदराव बडवाईक, (मौदा जि नागपूर), कु नंदा खुशाल गजभिये, (गोरेगाव जि गोंदिया) *मुख्याध्यापक गटातून* श्री विजय शंकर बावनथडे, (देवरी जि गोंदिया) *शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा गटातून* श्री रतिलाल रामचंद बाबेल (जुन्नर जि पुणे), *माध्यमिक गट - दिव्यांग क्षेत्रातून* श्री नरेश शंकर लिंगायत (दादर, मुंबई), श्री दिनेश माणिकराव गेटमे (सदर, नागपूर), *माध्यमिक गट - कला विभागातून* श्री रविंद्र मधुकरराव मुटे (समुद्रपूर जि वर्धा), श्री मिलिंद पुंडलिकराव सावरकर ( हिंगणघाट जि वर्धा),
*उच्च माध्यमिक गट - आदिवासी विभागातून* डॉ आशिष दादाराव देऊरकर (पुसद जि यवतमाळ), *प्रतिभावान शिक्षक कार्य गटातून* श्री नरेंद्र गोविंद कडवे (पारशिवनी जि नागपूर) यांना कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार - २०२१ अंतर्गत स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी संघटनेच्या कामगिरीचे वाचन करीत जुन्या पेन्शनच्या लढाई अधिक धारदार करण्यासाठी विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर लोकप्रतिनिधींनी सातत्याने रेटा लावून धरला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री दिनानाथ वाघमारे यांनी नविन शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रासाठी मारक असल्याचे सांगून या विरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. तर पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी जुन्या पेन्शनच्या लढाईत मी सदैव सोबत असून प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन खिमेश बढिये यांनी केले. तर संघटनेच्या कामगिरीचे वाचन श्री शेषराव खार्डे यांनी केले. उपस्थितांचे आभार रुपाली मालोदे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभागीय महिला संघटक सौ प्रणाली रंगारी, विभागीय सचिव श्री खिमेश बढीये, माध्यमिक शहर संघटक श्री राजु हारगोडे, माध्यमिक ग्रामीण जिल्हा संघटक श्री शेषराव खार्डे, महिला संघटिका सौ रिना टाले, नगरपरिषद संघटक सौ रुपाली मालोदे, टिईटी संघटक श्री गौरव दातीर, टिईटी जिल्हा संघटक श्री भिमराव शिंदेमेश्राम, प्राथमिक जिल्हा ग्रामीण संघटक श्री गणेश खोब्रागडे, श्री नामा जाधव, शिक्षकेतर कर्मचारी संघटक श्री मनिष जुनुनकर, प्राथमिक शहर संघटक श्री विवेक ढोबळे, मुख्याध्यापक श्री प्रकाश भोयर, मुख्याध्यापक श्री सुशील कुलकर्णी, मुख्याध्यापक विभागीय अध्यक्ष श्री धिरज यादव, गोंदिया जिल्हा संघटक श्री बालकृष्ण बालपांडे, गोंदिया जिल्हा संघटन सचिव श्री चंद्रशेखर पंचभाई, नागपूर शहर संघटक श्री ललित धार्मिक, कुही तालुका संघटक श्री अमोल राठोड, उच्च माध्यमिक संघटक श्री कमलेश सहारे, माध्यमिक संघटक श्री रंगराव पाटील, संजय कामथे, बाळकृष्ण पटले, विलास जायभाये, वर्धा जिल्हा संघटक श्री गुरुदत्त चवरे, जिल्हा ग्रामीण संघटक श्री गणेश उघडे, मौदा तालुका संघटक श्री उत्तम गि-हीपुंजे, कामठी तालुका संघटक श्री अरविंद घोडमारे, श्री संजय राऊत, श्री उमेश शेंडे, श्री मनोज पराते, आदिवासी विभाग संघटक श्री चंदू चौधरी, भटक्या विमुक्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मुकुंद अडेवार, श्रीमती रजनी बढिये यांच्यासह पुरस्कारार्थींचे परिवार, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा