२३ सप्टेंबर रोजी कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा



  २३ सप्टेंबर रोजी कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा



नागपूर - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूर विभाग नागपूर तर्फे आयोजित कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ चे वितरण २३ सप्टेंबर २०२१ रोजी रविभवन नागपूर येथे करण्यात येणार आहे.



या स्पर्धेला राज्यभरातून शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. छाननी समितीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करुन उपरोक्त निकाल समितीकडे सादर केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा मंत्री मा श्री सुनीलबाबू केदार राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण राज्यमंत्री मा श्री बच्चूभाऊ कडू, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य व महाज्योतीचे संचालक मा श्री बबनराव तायवाडे, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मा सौ रश्मीताई बर्वे, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा श्री अभिजित वंजारी उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ चे मानकरी पुढिलप्रमाणे


अंगणवाडी गट

१) सौ सुगंधा मारुती कचरे

प्रगती विद्यालय, (कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थी) दादर, मुंबई


प्राथमिक गट

१) श्री खुशाल किसन डोंगरवार 

पंचशील प्राथमिक शाळा, पिंपळगाव - कोहळी

ता. लाखांदूर जि. भंडारा 

२) श्री सुनील रुषीजी हटवार 

जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पारडी (ठवरे) 

ता. नागभीड जि. चंद्रपूर 


३) श्री देवेंद्र जगन्नाथ लांजेवार 

जि. प. उच्च प्राथमिक शाळा, निमगाव 

ता. धानोरा जि. गडचिरोली 


४) श्री एकनाथ विश्वनाथ पवार 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरीमजरा

ता उमरेड जि नागपूर 


५) सौ उमा सुधीर कुकडपवार

सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा, (महानगरपालिका) चंद्रपूर 


६) श्री सागर आनंदराव आत्राम 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा, आंबेशिवणी

ता जि गडचिरोली 


माध्यमिक गट

१) श्री रविंद्र आनंद सपकाळे ज्ञानप्रकाश विद्यालय, भटवाडी

घाटकोपर (प), मुंबई 


२) श्रीमती वसुंधरा वामन किटकुले (धोटे) 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, क-हांडला

ता कुही जि नागपूर 


३) डॉ ज्योतिमणी राॅक

दिनानाथ हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज, धंतोली नागपूर


४) श्री ओंकार दशरथ राठोड

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, जांभोरा

ता दारव्हा जि. यवतमाळ


उच्च माध्यमिक गट

१) प्रा डॉ मच्छिंद्रनाथ दिनकरराव नागरे

श्री उत्तरेश्वर ज्यूनिअर काॅलेज, केम

ता करमाळा जि सोलापूर


२) श्री सुनील आनंदराव बडवाईक

समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अरोली

ता मौदा जि नागपूर


३) कु नंदा खुशाल गजभिये

शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव

ता गोरेगाव जि गोंदिया


मुख्याध्यापक गट

१) श्री विजय शंकर बावनथडे

उच्चश्रेणी मुख्याध्यापक

शांताबाई पुर्व माध्यमिक शाळा कुणबीटोला /ककोडी

ता देवरी जि गोंदिया


शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा गट

१) श्री रतिलाल रामचंद बाबेल

अध्यक्ष जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ

ता जुन्नर जि पुणे

(राज्यस्तरीय वेबिनार तज्ज्ञ मार्गदर्शक)


माध्यमिक गट - दिव्यांग क्षेत्र

१) श्री नरेश शंकर लिंगायत

प्रगती विद्यालय (कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थी) दादर, मुंबई


२) श्री दिनेश माणिकराव गेटमे

शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग मुलांचे केंद्र, सदर, नागपूर


माध्यमिक गट - कला विभाग

१) श्री रविंद्र मधुकरराव मुटे

यशवंत विद्यालय  व कनिष्ठ कला महाविद्यालय, मांडगाव

ता समुद्रपूर जि वर्धा


२) श्री मिलिंद पुंडलिकराव सावरकर

भारत विद्यालय, हिंगणघाट

ता हिंगणघाट जि वर्धा


उच्च माध्यमिक गट - आदिवासी विभाग

१) डॉ आशिष दादाराव देऊरकर

मुंगसाजी कनिष्ठ महाविद्यालय, माणिकडोह

ता पुसद जि यवतमाळ


प्रतिभावान शिक्षक कार्य गट

१) श्री नरेंद्र गोविंद कडवे

धर्मराज विद्यालय, कन्हान

ता पारशिवनी जि नागपूर


उपरोक्त शिक्षकांची कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ करीता निवड करण्यात आली असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष, माजी शिक्षण मंडळ सदस्य, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांनी ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षकदिनी जाहीर केले होते. उपरोक्त शिक्षकांना २३ सप्टेंबर २०२१ रोजी गुरुवारी रविभवन नागपूर येथे सकाळी १० वाजता आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.


Kartratwan Shikshakaratna Award Ceremony

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा