NEET परिक्षेची निटनेटकी पूर्वतयारी


1.प्रवेशपत्र (Admit Card) ची रंगीन प्रिंट काढा. 

2. विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो प्रवेश पत्राच्या Page 1 वर दिलेल्या जागी चिटकवा.

3. विद्यार्थ्याचा पोस्टाचे कार्ड साईज म्हणजे 4X6 फोटो Admit card च्या Page 2 वर दिलेल्या जागी चिटकवा व त्यावर डाव्या बाजुला तुमची व पर्यवेक्षकाची क्रॉस Signature करावे.


४.पालकांनी सही प्रवेशपत्राच्या Page No.1 दिलेल्या जागी करावी

५. विद्यार्थ्यांची सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हा एक्झाम हॉल मध्ये गेल्यानंतरही करता येईल.


♦️ सोबत लागणाऱ्या आवश्यक गोष्टी


१. प्रवेशपत्र (All Pages)

२.पासपोर्ट साईज फोटो (किमान 2 जास्त काॅपिज सोबत ठेवाव्यात )

३. पारदर्शक पाण्याची बॉटली

४. ओळखीचा मुळ पुरावा (आधार कार्ड /बारावी बोर्ड एडमिट कार्ड)

५. एक मास्क केंद्रापर्यंत जावून जावे. परिक्षा केंद्रावर N-95 मास्क मिळणार आहे.

६.स्वतःजवळ हॅन्ड सॅनिटायझर (५० मिली) ठेवा.

७. साधा ट्रान्सपरंट ब्लॅक बॉल पेन


♦️ परिक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना ♦️


१.विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावर ऍडमिट कार्ड मध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाइमिंग च्या अगोदर पोहोचावे.

२.लक्षात ठेवा प्रत्येकासाठी रिपोर्टिंग टाइमिंग वेगवेगळा आहे. तुमच्या वेळेप्रमाणे नियोजन करा.

३ थोडा उशीर झाला तरीही घाबरून जाऊ नका. विनंती करा. मात्र 1.30 नंतर कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. हे मात्र पक्के लक्षात असू द्या.

४. वरील दिलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.

५. ऍडमिट कार्ड वरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात.

६. परीक्षेच्या अगोदर सेंटर बद्दल माहिती घ्यावी.

७. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटरच्या गावी पोंहचावे.


♦️ NEET Exam साठीचा ड्रेस कोड

१. ड्रेस हाफ बाहया (स्लिव्हज्) असावा.

२. मुलींनी साधे पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे.

३. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे मोबाईल, घड्याळ यांना सोबत ठेवण्यास बंदी आहे.

४. ड्रेस वरती एम्ब्रोईडरी ?किंवा डिझाईन नसावे. मोठे बटन सुद्धा नसावेत.

५. ड्रेस साधा असावा. जास्त पाॅकेट्स नसावेत.

६. कोणत्याही प्रकारची ज्वेलरी/दागिणे वापरूच नयेत.

७. बुट (शूज) वापरू नयेत. चप्पल साध्या असावेत. चपलचा सोल हा जाड नसावा.

८. बेल्ट वापरू नये. 


♦️ परिक्षा हॉल मध्ये


1. आपले पासपोर्ट साईज फोटो ( अॅडमिट कार्डवर ऑनलाईन केलेला) अटेंडन्स शीट वरती चिकटवावेत व स्वाक्षरी करावी. 

2. आपले एडमिट कार्ड परीक्षा संपल्यावर सुपरवायझर कडे जमा करायचे आहे.


♦️ पालकांना सूचना: ♦️

१. आपल्या पाल्याची परीक्षा संपेपर्यंत परिक्षा केंद्रापासून खुप दूर कोठेही जावू नका.

२.दरम्यानच्या कालावधीत परिक्षा केंद्रा बाहेर कोठे थांबणार आहात हे आपल्या पाल्यांना अगोदरच सांगून ठेवावे, म्हणजे मध्येच गरज भासली तर संपर्क करणे सोयीचे होईल. कारण त्याच्याकडे मोबाईल असणार नाही.

३.NEET परिक्षेचा पेपर कसाही जावु द्या,त्याचे फारसे दडपण घेवु नका वा आपल्या पाल्यावर दडपण आणू नका, रागावू नका. शक्यतो एक दोन दिवस Answer Key पाहू नका.

 ४.मेडिकल प्रवेश म्हणजेच सर्वस्व आहे. असे समजण्याचे कारण नाही. मेडिकल व्यतिरिक्त खूप कांही असते ज्याद्वारे तुम्ही आपले आयुष्य व करियर घडवू शकता. याबाबतीत ज्यांना आवश्यक आहे त्यांना वैयक्तिक स्तरावरून मार्गदर्शन केले जाईल.

सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना खूप खूप मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.... !

   यशस्वी भव....!!

💐💐💐💐💐💐💐

(विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा