गाथा बलिदानाची | ए. पी. जे. अब्दुल कलाम apj abdul kalam
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर( प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)🖥️
गाथा बलिदानाची
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿
📡🚀🛰️🇮🇳👮♂️🇮🇳🛰️🚀📡
भारतरत्न
अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
तथा
ए. पी. जे. अब्दुल कलाम
(भारताचे ११ वे राष्ट्रपती, वैज्ञानिक, अभियंता)
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१
(रामेश्वर)
मृत्यू : २७ जुलै २०१५
(शिलाँग)
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
🚀 कार्य 🛰
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
📚 शिक्षण
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
♦ स्वभाव
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
🥇 गौरव
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
निधन
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
SEARCH
SECCIONS
- उपक्रम (15)
- बातमी (94)
- विशेष लेख (44)
- शासन निर्णय (53)
- Education (95)
- PAT Answer key (1)
- YouTube (66)
हा ब्लॉग शोधा
ब्लॉग संग्रहण
- जानेवारी 2025 (2)
- ऑक्टोबर 2024 (1)
- सप्टेंबर 2024 (1)
- ऑगस्ट 2024 (2)
- जुलै 2024 (3)
- जून 2024 (1)
- मे 2024 (9)
- मार्च 2024 (2)
- फेब्रुवारी 2024 (1)
- जानेवारी 2024 (4)
- नोव्हेंबर 2023 (1)
- ऑक्टोबर 2023 (7)
- सप्टेंबर 2023 (17)
- ऑगस्ट 2023 (31)
- जुलै 2023 (28)
- जून 2023 (4)
- मे 2023 (19)
- एप्रिल 2023 (24)
- मार्च 2023 (24)
- फेब्रुवारी 2023 (27)
- जानेवारी 2023 (39)
- डिसेंबर 2022 (30)
- नोव्हेंबर 2022 (27)
- ऑक्टोबर 2022 (20)
- सप्टेंबर 2022 (38)
- ऑगस्ट 2022 (46)
- जुलै 2022 (36)
- जून 2022 (16)
- फेब्रुवारी 2022 (1)
- जानेवारी 2022 (3)
- डिसेंबर 2021 (6)
- नोव्हेंबर 2021 (19)
- ऑक्टोबर 2021 (25)
- सप्टेंबर 2021 (17)
- ऑगस्ट 2021 (42)
- जुलै 2021 (79)
- जून 2021 (40)
- मे 2021 (9)
- मार्च 2021 (3)
-
SSC (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर क...
-
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील लागू असलेल्या पुढील काही ठळक महत्त्वाच्या तरतुदी...... शिक्षक बंधुभगिनी य...
-
आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा