वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण – फक्त आश्वासने व शिक्षकांची फसवणूक


 ◼️◼️

शिक्षकांची फसवणूक करणारे 11 शासन निर्णय + परिपत्रके

पण निर्णय काहीच नाही




शिक्षकांना 12 वर्षानंतर लागणारी ‘वरिष्ठ वेतन श्रेणी’ व 24 वर्षानंतर लागणारी  ‘निवड श्रेणी’ या दोन्ही श्रेणींसाठी इतर सर्व अटींबरोबरच ‘21दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण’ ही महत्वाची अट  आहे. दोन्ही श्रेणी प्राप्त करण्यासाठी इतर सर्व अटींची पुर्तता करणे ही बाब ‘शिक्षकाचा नियुक्ती दिनांक’ व ‘अपेक्षित शैक्षणिक अहर्ता प्राप्ती’ या शिक्षकांच्या  वैयक्तीक घटकावर आधारित आहेत. परंतू ‘21 दिवसंचे सेवांतर्गत प्रशिक्षण’ ही अट जोपर्यंत प्रशासन तसे प्रशिक्षण लावत नाही तोपर्यंत त्याची पुर्तता करणे शिक्षकाला शक्य नाही. परंतू सन 2014  पासुन शासनाने या बाबतीत विविध प्रकारचे निर्णय घेणारे GR काढले व नंतर ते निर्णय अधिक्रमित केले. सन 2018 साली वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी चे प्रशिक्षण संदर्भात शिक्षकांची माहिती मागवण्यासाठी शिक्षकांना मंकी सर्व्हे ची लिंक पाठवुन संपूर्ण माहिती भरुन घेतली. त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची ‘पोहोच पावती’ देखील त्यांच्या ई-मेल ला दिली नाही. नंतर सदर माहितीच्या संदर्भाने  कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण लावले गेले नाही.  एकूण काय तर सन 2014 पासून प्रशासनाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित केलेच नाही. त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण:


1] 23 ऑक्टोबर 2017 चा शासन निर्णय-

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी पात्र होणाऱ्या शिक्षकांची संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत यादी जाहिर यावी व या यादीनुसार DIECPD व विद्याप्राधिकरण यांनी प्रशिक्षणाचे नियोजन करावे पण जरी ते पूर्ण केले तरी प्राथमिक शिक्षकांसाठी शाळासिद्धी मध्ये ‘A’ ग्रेड व 9वी व 10वी साठी 80% निकाल असेल तरच सदर श्रेणी देय असेल असा निर्णय 

कार्यवाही - सदर GR निघाल्यावरही वरिष्ठ व निवड श्रेणीचे सेवांतर्गत प्रशिक्षण लागु केले गेले नाही व 26ऑगस्ट 2019 ला वेगळ्या सुधारित नियमांचा GR काढुन हा GR अधिक्रमित करण्यात आला.


2] 21 डिसेंबर 2018 चा शासन निर्णय –

या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी पुढील प्रशिक्षणे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी साठी ग्राह्य धरण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला

1] प्राथ.विभाग -  1] भाषा मुलभूत क्षमता वाचन कार्यक्रम 2] गणित संबोध विकसन 3] तेजस प्रशिक्षण.

2] माध्य. विभाग - 1] अविरत-1 2] CHESS 3] आय आय टी चे गणित प्रशिक्षण 4] न्यास चे विज्ञान प्रशिक्षण

कार्यवाही - 26ऑगस्ट 2019 ला वेगळ्या सुधारित नियमांचा GR काढुन हा GR अधिक्रमित करण्यात आला.


3] 31 जुलै 2019 चा शासन निर्णय –

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागु करणे व त्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याबाबत.

कार्यवाही – अजुनपर्यंत तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु झालेली नाही.


4] 26 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय –

23 ऑक्टोबर 2017 व 21डिसेंबर 2018 ला काढलेले दोन्ही GR अधिक्रमित करुन 23 ऑक्टोबर 2017 पूर्वी वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता असलेल्या निकषांप्रमाणे पात्र शिक्षकांची यादी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने जाहिर करावी व त्याकरिता मागील दोन वर्षांचे गोपनिय अहवाल विचारात घेण्यात यावेत. 

कार्यवाही – पात्र शिक्षकांची यादी मागविण्याबद्दल जिल्हा व तालुका स्तरावर कोणतेही पत्र निघाले नाही


5] 22 ऑगस्ट 2019 चे मा. शिक्षण आयुक्तांचे पत्र –

मा . शिक्षण आयुक्त तथा संचालक श्री. विशाल सोळंकी साहेबांचे दि. 22/8/2019 रोजीचे मा. शिक्षण उपसंचालक, मुंबई यांना दिलेले, ‘ वरिष्ठ व निवड श्रेणी देय असणाऱ्या 25 शिक्षकांचा प्रायोगिक तत्वावर अभ्यास करुन अहवाल सादर करणेबाबतचे पत्र.


6] 17 नोव्हेंबर 2020 चे मा. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र –

वरिष्ठ व निवड श्रेणी लागु करणेबाबतच्या मंगळवार दि.20ऑक्टोबर 2020 रोजीच्या मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीचे इतिवृत्त. 1] 2 सप्टेबर 1989 च्या मुद्दा 9(2) नुसार सेवांतर्गत अट पूर्ण करणे ही अट आवश्यक 2] 23/10/2017 व 21/12/2018 हे दोन्ही निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने काढले नाही व प्रशिक्षणाची अट शिथिल केल्याने आर्थिक भार किती पडेल याची माहिती उपलब्ध नाही म्हणुन शासन निर्णय 26/08/2019 अन्वये वरिल दोन्ही निर्णय अधिक्रमित केले. 3] प्रशिक्षणाची अट शिथिल करण्यापेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांच्या ऐवजी 10 दिवसांचे ऑनलाईन पद्धतीने तात्काळ प्रशिक्षण देण्यात यावे.

कार्यवाही – दि. 17 नोव्हेंबर ते आजतागायत कोणत्याही ऑनलाईन प्रशिक्षणाचे आदेश निघाले नाहीत.


7] 10/03/2021 चे मा. शिक्षण संचालक, रा.शै.सं.व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र –

31/5/2021 अखेर वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र होणाऱ्या शिक्षकांची संख्या व सांख्यिकी माहिती 19/03/2021 पर्यंत सादर करणेबाबतचे शिक्षण उपसंचालक(सर्व) व शिक्षणाधिकारी (सर्व) यांच्या नावे आदेश.

कार्यवाही – सदर आदेश निघुनही दोन महिने झाले. परंतू प्रशिक्षणाबाबत कोणतेही आदेश निघाले नाही


8] 20/07/2021 चा GR -

प्रशिक्षण आयोजित केले जाईल. पण प्रत्यक्षात 27 ऑगस्ट येवुनही कोणतेही प्रशिक्षण आयोजित केले नाही.


9] इतर माध्यमांद्वारे झालेले प्रयत्न -

अजुनही समिती गठीत केली आहे हे उत्तर. इतर अनेक प्रशिक्षणे ऑनलाईन पधतीने आयोजित केली पण वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाबाबत मात्र कोणातिही निश्चित तारिख मात्र दिलिच नाही.

कार्यवाही-म्हणजे येथेही पुन्हा फक्त आश्वासन. जे 20 जुलै 2021 च्या GR मध्ये सांगितले तेच पुन्हा सांगितले. निश्चित तारीख किंवा महिना सांगितलाच नाही. लॉकडाऊन काळातही इतर अनेक प्रशिक्षणे आयोजित केली गेली व झाली पण(उदा.बालकांचे हक्क-3दिवसांचे युट्युब प्रशिक्षण) पण अजूनही वरीष्ठ व निवड श्रेणी च्या प्रशिक्षणाची निश्चित तारीख किंवा महिना सांगितला गेला नाही(फक्त आयोजित करणार आहोत-कधी ते सांगितले नाही) म्हणजे पुन्हा अगोदर प्रमाणे फक्त आश्वासन आणखी काहीही नाही. शिक्षकांच्या पदरात काहिच नाही,फक्त घोर निराशा.


10) दि 20जुलै 2021 चा GR-

फक्त प्रशिक्षित आयोजित करणार असे नमूद पण कधी आयोजित करणार याबाबत काहीही स्पष्टीकरण नाही


11) 22 ऑक्टोबर 2021 चे पत्र-


20 जुलै च्या Gr प्रमाणे कार्यवाही व्हावी असे नमूद केले. पण प्रशिक्षण कधी आयोजित करणार याबद्दल पुन्हा काहीही उल्लेख नाही

२ टिप्पण्या:

  1. सरळ सरळ प्रशिक्षण पासून सट देणे हाच चांगला उपाय आहे

    उत्तर द्याहटवा
  2. माझी सेवा ३१ वर्ष झाली असून जिप निवड श्रेणी लावण्या करीता निवडश्रेणी प्रशिक्षण प्रमाण पत्र मागवत आहे.माझ्या कडून प्रशिक्षण आवेदन पत्र भरून २०००/-भरलेले आहे पण अतपर्यंत प्रशिक्षण संबंधी काहीच सुचना नाही.

    उत्तर द्याहटवा