राज्य शासनाने महागाई भत्ता वाढवला. किती वाढवला? केव्हापासून मिळणार? कोणत्या महिन्यांचा गोठवला? रोखीने कधीपासून मिळणार?
H.R.A. सुद्धा वाढणार का? किती व कुठे कसा वाढणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ग्राफिक्स च्या माध्यमातून त्यासाठी बघा खालील व्हिडिओ
राज्य कर्मचारी/शिक्षक यांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.
1) माहे- ऑक्टोबर 2021पासून महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% करणे..
(वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-2019/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021(शासन निर्णय संकेतांक 202110071550585405)
2) 1जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर2019 या 5 महिन्यांचा 5% महागाई भत्ता वाढी चा फरक माहे ऑक्टोबर च्या वेतना सोबत रोखीने अदा करणे..
(संदर्भ- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-1319/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021 (शासन निर्णय संकेतांक 202110071602270505 )
3)घरभाड़े भत्ता दरात वाढ करणे
● 8 % वरुन 9 % (ग्रामीण भाग/ Z कैटेगरी)
● 16 % वरुन 18% (Y कैटेगरी शहरी क्षेत्र )
●24 % वरुन 27% (X कैटेगरी महानगर क्षेत्र)
(संदर्भ :- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- घभाभ-2019 / प्र. क्र. 2 /सेवा-5 , दिनांक- 5 फेब्रुवारी 2019)
5फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेले आहे की, जेव्हा प्रचलित महगाई भत्ता DA- दर 25% च्या वर जाईल तेव्हा घरभाड़े भत्ता(HRA) दरात X, Y, Z या प्रकारा नूसार अनुक्रमे 3% , 2% व 1% ची वाढ होईल..
त्यामुळे ज्या अर्थी आज महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% झाला आहे, म्हणजे महागाई भत्त्याची 25% मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या अर्थी ऑक्टोबर महिन्या पासून घरभाड़े भत्ता (HRA) दरात देखील वरील प्रमाणे आपोआपच वाढ होईल..
तरि सर्व शाळा/ कार्यालय यांनी शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलात या प्रमाणे बदल करून सुधारित बिले तयार करणे आवश्यक आहे, व त्यासाठी लागणारा आवश्यक निधि वरिष्ठ स्तरावर मागणी करणे देखील आवश्यक आहे...
घरभाड़े भत्ता वाढ 5 फेब्रूवारी2019 शासन निर्णयात नमूद असल्याने आता त्यासाठी स्वतंत्र परिपत्र किंवा निर्णय निघण्याची शक्यता नसल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून कळाले आहे, तथापि जर शासना कडे निधि ची अनुपलब्धता असेल तर शासन घरभाड़े भत्ता वाढ थांबवणे बाबत स्वतंत्र पत्र काढू शकते...
परंतु जर तसे पत्र निघाले नाही तर पूर्वीच्याच शासन निर्णयांनूसार सुधारित बदल करून घरभाड़े भत्ता मागणी नोंदवणे आवश्यक आहे..
माहितीस्तव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा