जुनी पेन्शन मिळविण्यासाठी अविरत संघर्षरत रहा - शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांचे आवाहन


जुनी पेन्शन मिळविण्यासाठी अविरत संघर्षरत रहा - शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांचे आवाहन



नागपूर - शासनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित, विना अनुदानित हा घोळ निर्माण करुन नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना पेन्शनच्या हक्कांपासून वंचित ठेवले. राज्यातील २७ हजार ९०० शिक्षकांना हक्कांपासून वंचित ठेवणा-या शासनाच्या भूमिकेविरोधात आक्रमक लढा द्यावा, असे आवाहन शिक्षक नेते, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे यांनी केले.

संविधान चौक नागपूर येथे गुरुवारी (ता ७) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस श्री मिलिंद वानखेडे बोलत होते. या आंदोलनात शिक्षण नेते, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राचार्य डॉ बबनराव तायवाडे, शिक्षक आमदार नागो गाणार, आंदोलन आयोजक ज्ञानेश्वर गलांडे, नरेंद्र पिपरे, नरेंद्र फाले, सुरेश बोबडे, सुनील कोल्हे, रामकृष्ण ठाकरे, रवि हिवरकर, चंदू खांबलकर, अंजुशा बोधनकर,  प्रतिभा टापरे, निर्मला गिद, ग्यानी लोणारे, छाया गिरोलकर, पुरुषोत्तम श्रीराव, राजेश गजभिये, शेषराव बाभरे आदी उपस्थित होते. 

या आंदोलनात नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या सर्वच शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकाच्या आधारावर जुनी पेन्शन योजना लागू करावी, बंद केलेले GPF खाते पूर्ववत सुरू करावे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी रोखीने देण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या. यानंतर नागपूर बोर्डाचे सहसचिव श्री श्रीराम चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 

या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी मारोती खेडेकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, भाजप शिक्षक आघाडीचे उल्हास फडके, विजुक्टाचे अशोक गव्हाणकर, शिक्षक भारतीचे दिलीप तडस, विदर्भ शिक्षक संघाचे गजानन भोरळ, विदर्भ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष नामा जाधव, मनीषा कोलारकर, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे खेमराज कोंडे, दिलीप बोस, मुते सर, सिद्धार्थ गेडाम, पुरुषोत्तम पंचभाई, काॅगेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय धरममाळी, शिक्षक परिषदेचे अनिल शिवणकर, विलास केरडे, शिक्षक भारतीचे भारत रेहपाडे, सपन नेहरोत्रा, काॅगेस शिक्षक सेल मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष प्रकाश भोयर उपस्थित होते.



 या आंदोलनात ज्ञानेश्वर गलांडे, सुनील कोल्हे, नरेंद्र फाले, रामकृष्ण ठाकरे, नरेंद्र पिपरे, रवींद्र वाठ, प्रबल सरकार, प्रशांत भुरे, देवेंद्र केदार, शेट्टी सर, राजू हारगुडे, किशोर राऊत, रवि हिवरकर, अंजूषा बोधनकर, चंदू खांबलकर, राजेश गजभिये, सुनील मने, चंद्रशेखर रेवतकर, सुरेश बोबडे, बाळकृष्ण पिलारे, प्रतिभा टापरे, विनोद लच्छोडे, ग्यानी लोणारे, राजेश तुमसरे, विशाल टेंभुर्णे, खान सर,  रुबिया अब्बास, ए. एम. सायरे, देविदास इटनकर, रामरतन पुडके, विनायक तितरमारे, छाया गिरोलकर, अशोक भोयर, सुनीता बोरकर, निर्मला गीद, धर्मशील वाघमारे, मीना दहाघाने, जयश्री पावनकर, श्रीकृष्ण रामटेके, शैला किरपान, सरोज गोंडाणे, प्रशांत गुरनुले, चेमदेव वसू, पुष्पा पाल, सुखदेव बोडखे, मंजुषा जामगडे, नीलिमा नागपुरे, देवेंद्र खराटे, मनीष केदार, हरिहर धवड, संगीता तट्टे, वर्षा फुटाणे, संध्या इंगळे, रोशन चौधरी, अमिता चरडे, माया चांदूरकर, अपर्णा भिंगारे, अविनाश धोटे, बंडू भगत, नरेश सहारे, उल्हास चिंचपाले, राजेंद्र माकडे, राजेश बोहरूपी, संजय बडोले, राजश्री धांडे, मिथिला बोरकर, प्रभाकर गंथडे, झिबल लांडगे आदी सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा