DCPS / NPS धारकांना सेवा उपदान व कुटुंब निवृत्ती वेतन | संघटनेच्या पाठपुराव्याला यश!


 सर्वांना नमस्कार ! 🙏

          विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) व समविचारी इतर शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश!

        विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) चे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च २०२१ रोजी वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री नितीन गर्दे यांच्याशी मंत्रालयात भेट घेऊन DCPS / NPS धारकांना सेवा उपदान व कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबत निवेदन सादर केले होते. या संदर्भातील निवेदन वित्त राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांना सुद्धा देण्यात आले होते. 



मध्यंतरीच्या काळात वित्त राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली DCPS /NPS मधील त्रुटिसंदर्भात बैठक पार पडली. यात विविध संघटनेकडून मृत्यू सेवा उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन या संदर्भात आग्रही भूमिका मांडली. 


अखेर विविध संघटनांच्या एकजुट दबावाने बुधवारी (ता १७) NPS मधील त्रुटींची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने मृत्यू सेवा उपदान आणि कुटुंब निवृत्तीवेतन यासाठी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांना माहिती मागविलेली आहे.

     हे संघटनेसाठी मोठे यश आहे.

   आपली मागणी ही मृत्यू सेवा उपदान सोबतच सेवानिवृत्त उपदान (Retirement Gratuity ) ही सुद्धा आहे.ती सुध्दा मिळविण्यासाठी प्रयत्न करु आणि मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहणार !

मयत बांधवांच्या कुटुंबाला कुंटुब निवृत्ती वेतन व सेवाउपदान प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार. 


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥


शेवटी सर्वांना लक्षात घ्यायचे आहे की, संघर्ष अटळ आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी आहे.

 एकत्रित राहू, संघटित राहू

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग 

9860214288, 9423640394 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा