😷 गेल्या अनेक दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे
✒️ यामध्ये सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे
🤷♂️ पहा कसे असतील नवे नियम ?
● नवीन नियमानुसार - रिक्षा, टॅक्सी, बस, तसेच कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल.
● तसेच राज्यात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक असेल.
● मॉल, सिनेमागृह, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल तर ५० टक्के क्षमतेच्या लोकांनाच उपस्थित राहता येईल - तर मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड भरावा लागणार.
● दुकानात ग्राहकांनी मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड भरावा लागणार आहे.
● तसेच राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड - तसेच भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
● याव्यतिरिक्त टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड तर वाहन मालकास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.
● तसेच सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.
या माहीत आहे
उत्तर द्याहटवा