*प्राथमिक शिक्षक संघटनांची सहविचार सभा संपन्न*
*दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विद्यार्थ्यांसाठी २९ जून २०२२ पासून प्रत्यक्ष शाळा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले.*
आज (ता १६) संत तुकडोजी महाराज सभागृहात प्राथमिक शिक्षक संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. *यावेळी सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य संयोजक श्री वानखेडे, उपशिक्षणाधिकारी श्री भास्कर झोडे उपस्थित होते.*
यात शाळांनी शाळापूर्व तयारीची कामे पूर्ण करणे, जिल्हा परिषद शाळा दुपारच्या सत्रात भरविणे, शालेय परिसर स्वच्छ, पहिल्या दिवसापासून सकस आहार देणे इत्यादी बाबतीत मार्गदर्शन करुन सर्व शाळांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.
*यावेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे* सर्व शाळांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठय़पुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, DBT व गॅसचे अनुदान अद्याप जमा झाले नाही ते तातडीने जमा करावे, सर्व मुख्याध्यापकांची जुलै महिन्यात जिल्हास्तरीय सभा आयोजित करावी या विषयावर चर्चा केली. सदर विषयावर चर्चा करुन लवकरच विषय मार्गी लागतील असे आश्वासन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिले.
या बैठकीला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागाचे विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, जिल्हा ग्रामीण संघटक श्री गणेश खोब्रागडे, जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक संघातर्फे श्री खुशाल कापसे, श्री चंद्रकांत मेश्राम, श्री परशुराम गोंडाणे, श्री धनराज राऊळकर, श्री राजु नवनांगे, श्री लिलाधर सोनवाने, श्री दिपक तिडके, श्री मनोज घोडके, श्री शरद भांडारकर, श्री गौरीशंकर साठवणे व शिक्षण विभागाचे कार्यालयीन लिपिक श्री श्रीकांत कुनघाटकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा