SchoolChale *धर्मराज शैक्षणिक परिसरात शालेय प्रवेशोत्सव साजरा*


*धर्मराज शैक्षणिक परिसरात शालेय प्रवेशोत्सव साजरा*





*२९ जून शाळेचा पहिला दिवस साजरा*

*विद्यार्थ्यांचे 'स्कुल चले हम'*

कन्हान :- गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी *धर्मराज शैक्षणिक संस्थेत* प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
*शिक्षणोत्सव २०२२* आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कांद्री ग्रामपंचायतचे सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे, कांद्री ग्रामपंचायतच्या सदस्य सौ अरुणा हजारे, पालक प्रतिनिधी श्री विधिलाल डहारे, धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिनेश ढगे उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प वर्षाव करुन चाॅकलेट वाटप करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. *सहज मनाच्या संस्कारांना उत्तम आहे शाळा.... म्हणूनच अ, आ, इ शिकण्यास.... नियमित जा बाळा* या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करुन सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री नरेंद्र कडवे यांनी तर आभार श्री अमीत मेंघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री किशोर जिभकाटे, श्री राजू भस्मे, श्री सतीश राऊत, श्री तेजराम गवळी, श्री दामोधर हाडके, श्री प्रशांत घरत, सौ चित्रलेखा धानफोले, कु हर्षकला चौधरी, सौ माला जिभकाटे, सौ कोकीळा सेलोकर, सौ छाया कुरुटकर, सौ सरीता बावनकुळे, कु प्रिती सुरजबंसी, कु पूजा धांडे, कु अर्पणा बावनकुळे, कु शारदा समरीत व पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा