Teacher Union Meeting प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवा*


*प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवा*
🟣 *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी*
🟣 *RTE चे प्रस्ताव तातडीने निकाली काढा*




नागपूर - प्राथमिक शिक्षकांच्या विविध विषयात लहान लहान स्वरूपात त्रुट्या काढून त्रास देण्यात येतो. पारदर्शकता ठेवून शिक्षकांचे प्रकरण तातडीने निकाली काढावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे शिक्षणाधिकारी (प्राथ) यांच्याकडे करण्यात आली.
आज (ता २४) प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी *शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे* यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची *प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार* यांच्या दालनात बैठक पार पडली.
यात अनुकंपा संदर्भातील प्रकरण तातडीने निकाली काढावे, RTE प्रस्तावात लहान लहान त्रुट्या टाकून प्रकरण प्रलंबित ठेवण्यात येत आहे. सदर प्रलंबित RTE प्रकरण तातडीने निकाली काढण्यात यावे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत अद्यापही अनेक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके प्राप्त झाले नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप करण्याच्या योजनेला हरताळ फासण्यात येत आहे. सदर प्रकरणी तातडीने लक्ष केंद्रित करून सर्व शाळांना २९ जून पर्यंत पाठ्यपुस्तक उपलब्ध करून द्यावे, २०%, ४०% शाळांचे पगार नियमितपणे महिन्याच्या एक तारखेला करण्यात यावे, DCPS व NPS संदर्भातील घोळ तातडीने दुरुस्त करून शिक्षकांच्या अकाउंट मध्ये सदर रक्कम तातडीने जमा करण्यात यावी, शापोआ DBT व गॅसचे अनुदान अद्याप अनेक शाळांना जमा झाले नाही, त्यामुळे मुख्याध्यापकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणी तातडीने शापोआ DBT व गॅसचे अनुदान देण्यात यावे, जिल्हा परिषद, गट शिक्षणाधिकारी व शाळा यामध्ये कार्यालयीन सुसूत्रता येण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांची जिल्हा स्तरावर सभा आयोजित करण्यात यावी, प्रभारी मुख्याध्यापक पदाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात यावे, Without T C Admission बाबद स्वयंस्पष्टता करण्यात यावी तशी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात यावे, शिष्यवृत्ती प्रस्ताव संदर्भात तालुका स्तरावर समाज कल्याण सोबत शिबीर घेऊन विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यात यावे अशा मागण्या करण्यात येऊन यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली.
सदर विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिले. या बैठकीला शिक्षक नेते व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूर विभाग नागपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र खंडाईत, विभागीय महिला अध्यक्षा सौ प्रणाली रंगारी, जिल्हा ग्रामीण संघटक श्री गणेश खोब्रागडे, महिला संघटिका सौ रिना टाले, काॅंग्रेस शिक्षक सेल विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भोयर, टिईटी जिल्हा संघटक श्री अमोल राठोड, शहर संघटक श्री विवेक ढोबळे, श्री प्रकाश कळसकर, सौ छबु घोटेकर, सौ प्रतिभा ढुमणे, अधिक्षक श्रीमती भारती गेडाम, विस्तार अधिकारी श्री कोकोडे, गटशिक्षणाधिकारी सौ हटवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शालीनी रामटेके, गटशिक्षणाधिकारी श्री विजय भाकरे, श्रीमती राजस्वी बोडखे, वेतन पथक अधिक्षक, शापोआ लेखाधिकारी श्री मानमोडे, कार्यालयीन लिपिक श्री उमेश जायभाये, श्री दिलीप वानखेडे, श्री श्रीकांत कुनघाटकर यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा