*15 जूलै दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1997 - पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेस पुरस्कारा साठी निवड*
👉 *1962 - शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणारा ज्ञानप्रबोधनी या संस्थेचे पुणे येथे प्रारंभ*
👉 *1955 - पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1949 - माधव कोडविलकर दलित साहित्यीक यांचा जन्म*
👉 *1932 - नरहर कुरंदकर- विव्दान, टिकाकार आणि लेखक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *2004 - डाॅ. बाबू कोयाची- कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात 60 वर्ष कार्य करणारा सामाजिक कार्यकर्ता यांचे निधन*
👉 *1999 - जगदीश गोडबोले- पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
*⚜️ आझादी का अमृत महोत्सव ⚜️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🎓⛓️🇮🇳🧕🇮🇳⛓️🎓⚜️
*दुर्गाबाई देशमुख*
(भारतीय क्रांतिकारी, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या) पुर्ण नाव : दुर्गाबाई चिंतामणराव देशमुख
टोपणनाव : जॉन ऑफ ओर्क
*जन्म : १५ जुलै १९०९*
(काकीनाडा, आंध्र प्रदेश, भारत)
*मृत्यू : ९ मे १९८१*
(हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत)
शिक्षण : एम.ए.
राष्ट्रीयत्व : भारतीय
कार्यक्षेत्र : समाजसेवा, शिक्षक, स्वातंत्र सेनानी
भाषा : तेलुगु, हिंदी, इंग्रजी
चळवळ : मिठाचा सत्याग्रह
वडील : श्री. बीवीएन रामाराव
आई : कृष्णवेनम्मा
पती : सी.डी. देशमुख
पुरस्कार : नेहरु साक्षरता पुरस्कार, पॉलजी हाफमैन पुरस्कार, यूनेस्को पुरस्कार, जीवन पुरस्कार, जगदीश पुरस्कार, पद्म विभूषण-१९७५. दुर्गाबाई देशमुख ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व बँकेचे तिसरे गर्व्हनर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्त मंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते. त्या भारतीय संविधान सभेच्या सदस्या होत्या. तसेच भारतीय नियोजन आयोगाच्यासुद्धा सदस्या होत्या. 💁🏻♂️ *जीवन* दुर्गाबाई यांचा जन्म १९०९ मध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंदरी जिल्हातील काकीनाडा या गावी झाला. दुर्गाबाईंचा वयाच्या 8व्या वर्षी सुब्बाराव यांच्याशी विवाह झाला. पण परिपक्व झाल्यानंतर दुर्गाबाईनी एकत्र राहण्यास नकार दिला. आणि त्यांच्या वडिलांनी आणि भावाने त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. व पुढील शिक्षणासाठी बाहेर पडल्या. आई श्रीमती कृष्णवेन्मा आणि वडील श्री. बीवीएन.रामाराव होते. दुर्गाबाईंचे वडील समाजसेवक होते. लहानपणापासूनच मातृत्व, देशभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांवर दुर्गाबाईंच्या मनावर परिणाम झाला होता. १९५३ मध्ये त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख यांच्याशी वयाच्या ४४व्या वर्षी विवाह केला. दुर्गाबाई यांनी द स्टोन यू स्पीकेथ नावाचे पुस्तक लिहिले. १९८१ मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांचे निधन नरसानापेता श्रीकाकुलम जिल्ह्यात झाले. 📚 *शिक्षण*
दुर्गाबाईंच्या बालपण काळात मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. पण दुर्गाबाईना शिकण्याची खूप आवड होती. त्यांनी आपल्या शेजारच्या एका शिक्षकाबरोबर हिंदीचा अभ्यास सुरू केला. त्या काळात हिंदीचा प्रसार हा राष्ट्रीय चळवळीचा एक भाग होता. दुर्गाबाईंनी लवकरच हिंदी भाषेत अशी योग्यता प्राप्त केली आणि १९२३ मध्ये त्यांनी मुलींसाठी राजमुंद्री येथे बालिका हिंदी पाठशाला ही शाळा सुरू केली. या प्रयत्नाचे कौतुक करून गांधीजींनी दुर्गाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविले. १९५३ मध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
🌀 *कारकीर्द* दुर्गाबाईंचा लहानपणापासूनच भारतीय राजकारणाशी संबंध होता. वयाच्या 12 व्या वर्षी, इंग्रजी माध्यमाचे शिक्षण लादण्याच्या निषेधार्थ त्यांनी शाळा सोडली. मुलींच्या हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नंतर राजमुंद्री येथे बालिका हिंदी पाठशाळा सुरू केली.
1923 मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची परिषद त्यांच्या गावी काकीनाडा येथे भरली होती, तेव्हा त्या एक स्वयंसेविका होत्या आणि खादी प्रदर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांची जबाबदारी होती की तिकीट नसलेले अभ्यागत प्रवेश करू नयेत. त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आणि जवाहरलाल नेहरूंना प्रवेश करण्यास मनाई देखील केली. जेव्हा प्रदर्शनाच्या आयोजकांनी तिने काय केले ते पाहिले आणि रागाने त्यांना फटकारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की त्या फक्त सूचनांचे पालन करत आहेत. आयोजकांनी त्यांच्यासाठी तिकीट खरेदी केल्यानंतरच त्यांनी नेहरूंना प्रवेश दिला. नेहरूंनी त्यांचे कर्तव्य ज्या धैर्याने केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. त्यांनी कधीही दागिने किंवा सौंदर्य प्रसाधने परिधान केली नाहीत आणि त्या सत्याग्रही होत्या. सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान गांधींच्या नेतृत्वाखालील मिठाच्या सत्याग्रह उपक्रमात सहभागी झालेल्या त्या एक प्रमुख समाजसुधारक होत्या. चळवळीत महिला सत्याग्रही संघटित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे ब्रिटिश राज अधिकाऱ्यांनी त्यांना 1930 ते 1933 दरम्यान तीन वेळा तुरुंगात टाकले.
तुरुंगातून सुटल्यानंतर दुर्गाबाईंनी आपले शिक्षण चालू ठेवले. त्यांनी बीए पूर्ण केले. आणि त्यांनी आंध्र विद्यापीठातून 1930 मध्ये राज्यशास्त्रात एम.ए. 1942 मध्ये मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली आणि मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली.
दुर्गाबाई या अंध मदत संघाच्या अध्यक्षा होत्या. त्या क्षमतेत त्यांनी अंधांसाठी शाळा-वसतिगृह आणि प्रकाश अभियांत्रिकी कार्यशाळा उभारली. ⛓️ *तुरुंगवास*
दुर्गाबाईंनी प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्या बरोबर त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. २५ मे १९३० रोजी दुर्गाबाईंना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि तीन वर्षांची तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगाच्या या काळात दुर्गाबाईंनी इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढवले. 🔮 *महत्त्वपूर्ण योगदान*
त्यांनी १९३७ मध्ये आंध्र महिला सभेची स्थापना केली. तसेच विद्यापीठ महिला संघ, नारी निकेतन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी दुर्गाबाई यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आयोगाने प्रकाशित केलेले ‘एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सर्व्हिस इन इंडिया’ तयार केले गेले. आंध्र मधील खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना 'नेहरू साक्षरता पुरस्कार' देण्यात आला. त्यांनी बरीच शाळा, रुग्णालये, नर्सिंग शाळा आणि तांत्रिक शाळा स्थापन केली. तसेच अंधांसाठी शाळा, वसतिगृहे आणि तांत्रिक प्रशिक्षण केंद्रेही त्यांनी उघडली. 🎓 *वकिली*
तुरुंगातून आल्यानंतर दुर्गाबाईंनी मद्रास विद्यापीठात नियमित अभ्यास सुरू केला. एम.ए.च्या परीक्षेत त्यांना पाच पदके मिळाली. तिथूनच त्यांना कायद्याची पदवी मिळाली आणि १९४२ मध्ये दुर्गाबाईंनी सराव सुरू केला. खुनाच्या प्रकरणात युक्तिवाद करणारी ती पहिली महिला वकील होती.
🏆 *पुरस्कार* पॉल जी हॉफ़मैन पुरस्कार
नेहरू साक्षरता पुरस्कार
यूनेस्को पुरस्कार
पद्म विभूषण पुरस्कार
जीवन पुरस्कार आणि जगदीश पुरस्कार ✍️ *लिहीलेली पुस्तके*
चिंतामण अँड आय (आत्मचरित्र)
द स्टोन यू स्पीकेथ
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
♾️♾️♾️ *227* ♾️♾️♾️ ➖➖➖➖➖➖➖➖➖
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा