नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक..2023


*नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक*...2023

*मतदार नोंदणीबाबत महत्त्वाची सुचना*........

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम घोषित केला आहे.

त्यानुसार दि.01 नोव्हेंबर 2022 पूर्वीच्या सहा वर्षात किमान तीन वर्ष पूर्ण सेवा असलेल्या शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करता येते. याबाबतचा कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषित करण्यात आला आहे.


1. मतदार नोंदणीबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक
01 ऑक्टोबर 2022 (शनिवार)

2. मतदार नोंदणी बाबत वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम
पुनर्प्रसिद्धी
दि. 15 ऑक्टोबर 2022

3. मतदार नोंदणी अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनर प्रसिद्धी दिनांक 25 ऑक्टोबर 2022

4. मतदार नोंदणी फॉर्म नमुना 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2022

5. मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्याचा दि. 23 नोव्हेंबर 2022

6. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
दि 23 नोव्हेंबर 2022 ते दि 9 डिसेंबर 2022

7. दावे व हरकत निकाली काढण्याचा व पुरवणी यादी तयार करण्याचा प्रसिद्धीचा दिनांक......
दि. 30 डिसेंबर 2022 (शुक्रवार)

8. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी
दि. 30 डिसेंबर 2022

सदर मतदार नोंदणी बाबतचा फॉर्म 19 हा सुधारित करण्यात आला आहे. सदर सुधारित फॉर्म क्र 19 आपल्यापर्यंत पोचविण्याची व्यवस्था *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)* संघटनेच्या blog वर तसेच कार्यकर्ता चा मदतीने आपल्या पर्यंत पोहचविल्या जाईल व तहसिल कार्यालयात सुध्दा उपलब्ध राहील याची नोंद घ्यावी .

सर्व पदाधिकारी यांनी आपल्या शाळेतील सर्व पात्र शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत दक्ष राहून सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती आहे.

आपला

*मिलिंद वानखेडे*
*माजी शिक्षण मंडळ सदस्य*
संस्थापक अध्यक्ष - *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)* नागपूर
*9860214288,9423640394*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा