*28 जूलै दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला*
👉 *1999 - भारतीय धवल क्रांती चे शिल्पकार डॉ वर्गीस कुरीयन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान करण्यात आला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1945 - अमेरिकन व्यंगचिञकार जिम डेव्हिस यांचा जन्म*
👉 *1967 - टपरवेअर चे संशोधक अर्लटपर यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
*👉१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: ? ? १९६२)*
*👉२०१६: पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेतादेवी यांचे निधन.*
*👉२०१७: भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचे निधन.*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मराठी व्याकरणातील काळाचे एकूण प्रकार किती व कोणते?*
*🥇३ प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ.*
*👉गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे?*
*🥇गांधीनगर*
*👉CID चे संक्षिप्त रूप काय आहे?*
*🥇 क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट*
*👉कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?*
*🥇कोल्हापूर*
*👉महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली?*
*🥇1960*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*⬆️ चढ आणि उतार ⬇️*
*आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.'*
*बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते.*
*थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले.*
*त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...'*
*🧠तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*📢शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय*
*📢शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत, दिल्लीवारीनंतर मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर*
*📢गावखेडी इंटरनेटेने जोडण्यासाठी मोठा निर्णय, ग्रामीण भागात 4G सेवा पोहोचवण्यासाठी 26 हजार 316 कोटींचा निधी मंजूर*
*📢राज्यातील 10 राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई.*
*📢ईडीच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, 250 याचिकांवर निर्णय देताना बहुतांश आक्षेप फेटाळले*
*📢नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका*
*📢ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे *
मुख्याध्यापक
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन - 9860214288
____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा