*वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ बाबत...*
*संजय नागे दर्यापूर 9767397707*
*New update (१५जुलै)*
*प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कालावधी ३१ जुलै, २०२२ पर्यंत वाढविण्यात आलेला आहे*
*राज्यात एकूण ९४,५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.*
*तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.*
*तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये.*
*दिनांक २५ जुलै, २०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद घेण्यात यावी.*
*सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना या* https://training.scertmaha.ac.in *या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.*
*प्रशिक्षण दरम्यान कोणतेही प्रकारची अडचण येत असल्यास झूम मीटिंगमध्ये सहभागी व्हा*
*दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्र झूम लिंक zoom app वर -*
*दि. 2 जूूूून ते 30 जुलै दररोज स. 10.30 ते 12 या वेळेत*
ZOOM App meeting link - Click Here
Meeting ID - 872 9666 0474
Pass code - SCERT
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा