11 AUGUST DINVISHESH


*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव*.......*हर घर तिरंगा*
*12 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
   
     
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2002 - 11 वर्षं  7 महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेन चा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुध्दिबळातील  ग्रंडमास्टर बनला*         
👉 *2000 - प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेघा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

👉 *1948 - कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाबी  तथा फ.मु.शिंदे  यांचा जन्म*
👉 *1925 - गिनीज वर्ल्ड रिकार्ड स चे सहसंस्थापक नाॅरिस मॅक्विहिर  यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1984 - कवी,समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन*
👉 *2005 - लक्ष्मण कादिरमगार  श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री, मुत्सद्दीपणा, वकील व तमिळ नेते यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती केंव्हा असते?*
*🥇5 सप्टेंबर (शिक्षक दिवस)*

*👉कानिफनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे?*
*🥇मढ़ी (अहमदनगर)*

*👉देशातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?*
*🥇मुंबई आकाशवाणी केंद्र*

*👉महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय कोणता आहे?*
*🥇शेती*

*👉365 दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?*
*🥇सौर वर्ष*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*👴🏻म्हातारा आणि मृत्यु👤*
     
      *एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला.*
      *वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला. त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.'*
      *ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्‍याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्‍या म्हातार्‍याला माहीत नव्हते.*
       *मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्‍याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.'*

*🧠तात्पर्य :-* 
*मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम.*
*📢जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ..*
*📢राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टमध्ये होणार.*
*📢कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भात यलो अलर्ट, राज्यातली धरणं तुडुंब भरली*
*📢Mumbai Indians : मोठी घोषणा! राशिद खान, कागिसो रबाडा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळणार*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि. वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖


*⚜️ आझादी का अमृत महोत्सव ⚜️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬
     संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
               चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
🤺⛓🔗🇮🇳🙅‍♂🇮🇳🔗⛓🤺

      🤺 *मणिपूरचा सिंह -* 
            *टिकेंद्रजित सिंग* 🏇

     *फाशी : 13 ऑगस्ट 1891*
                   *(मणिपूर)*

          मणिपुर चा राजा गंभीरसिंह  हा कंपनी सरकारचा चांगला मित्र होता. त्याच्या नंतर त्याचा मोठा मुलगा चंद्रकिर्ती सिंह हा गादीवर आला. 
चंद्रकीर्ती सिंहाने एकूण आठ विवाह केले.  त्याच्या तिस-या राणीचा मुलगा हा टिकेंद्रजित सिंह.  
          हा लहानपणापासूनच धाडसी व निडर होता.  रणविद्या, घोडेस्वारी व राजनीतीत तो निपुण होता.  शिकार करणे हा त्याचा आवडता छंद होता. अनेक वाघांना त्याने समोरासमोर तलवारीने व भाल्याने ठार केले होते. त्यामुळे त्याची कीर्ती संपूर्ण मणिपुर राज्यात पसरली होती. मणिपुरी जनतेच्या मनात त्याच्याविषयी फार आदर होता.
       कंपनी सरकारने नागा राज्यावर 1878 मध्ये चढाई केली त्यासाठी मणिपूरच्या राजाने सहाय्य करावे असे कंपनी सरकारने आपल्या रेसिडेंट मार्फत चंद्रकीर्ती सिंहाला कळविले तेव्हा टिकेंद्रजित सिंहाने आपल्या सैन्यासह त्या लढाईत भाग घेऊन इंग्रजांना चांगली मदत केली.  त्याने नागा सैन्याची दाणादाण उडवून दिली. इंग्रज सरकारने त्याच्या पराक्रमावर खुश होऊन टिकेंद्रजित सिंहाला समारंभपूर्वक सुवर्णपदक प्रदान केले आणि त्याच्या सैनिकांना ही बक्षिसे दिली.  सन 1885 मध्ये कंपनी सरकारने ब्रह्मदेशावर चढाई केली त्या युद्धातही टिकेंद्रजित सिंहाने इंग्रज सरकारला बहुमोल मदत केली.  ब्रह्मदेशाच्या लढाईत टिकेंद्रजित सिंहाने मोठा पराक्रम गाजविला.  त्यात अनेक इंग्रजांचे प्राण वाचले. टिकेंद्रजित सिंहाच्या मदतीविना इंग्रजांना ब्रह्मदेश जिंकताच आला नसता. 
       सन 1880 मध्ये नागा लोकांनी मणिपुर वर हल्ला केला तेव्हा टिकेंद्रजित सिंहाने या युद्धासाठी इंग्रज सरकारकडे मदत मागितली पण इंग्रज सरकारने मदत दिली नाही.  टिकेंद्रजित सिंहाने आपल्या बाहुबळावर नागांचा  पराभव केला. त्याचे हे शौर्य राजा शुरचंद्राने पाहिल्याने त्याला सेनापती पद दिले. 
        मणिपूरच्या राज्यात नंतरच्या काळात गृहकलह माजला. त्यानंतर 21 मार्च 1891 रोजी इंग्रज सरकारने महाराज शूरचंद्र यांना कळविले की तुम्हाला मणिपूरची गादी मिळणार नाही.  त्याऐवजी कंपनी सरकारकडून तुम्हाला पेन्शन मिळेल.  शूरचंद्राला त्यावरच समाधान मानावे लागले.  इंग्रज सरकारने रेसिडेंट ग्रिमवुड याला गुप्त सूचना दिली की, कसेही करून टिकेंद्रजित सिंहाला कैद करावे.  टिकेंद्रजीत सिंहासारखा शूर व पराक्रमी लढवय्या मणिपुरात असला तर ते राज्य मुळीच बळकावता येणार नाही, हे इंग्रजांना समजून चुकले होते. पण ही बाब टिकेंद्रजित सिंहाच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. 
        इंग्रज सरकारने समजावून पाहिले की हे राज्य सोडून कुठे गेल्यास कंपनी सरकार आपणास पेन्शन देईल पण टिकेंद्रजित सिंह ऐकायला तयार नव्हता.  अखेर कंपनी सरकारने त्याच्या  महालावर हल्ला केला. पण मणिपुरी सैन्य व जनतेने एवढा प्रखर हल्ला चढविला की त्यात अनेक इंग्रजांना आपला प्राण गमवावा लागला.  शेवटी नाईलाजास्तव इंग्रजांनी युद्धबंदीचा बिगुल वाजवला व लढाई थांबवली.
              अनेक कुरघोड्यानंतर कंपनी सरकारने धूर्त चाल खेळली.  चहूबाजूंनी कंपनी सरकारचे सैंन्य मणिपुर वर चाल करून येत असल्याची बातमी टिकेंद्रजित सिंहांना लागल्याबरोबर राजा शुरचंद्र, थंगाल व इतर सर्वजण आपल्या कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी निघून गेले.  इंग्रज सैन्य राजधानीत पोहोचले खरे पण त्यांना तिथे दहा-पंधरा माणसांव्यतिरिक्त कोणीच दिसले नाही.  कंपनी सरकारने त्यांना पकडून देणाऱ्यास हजारो रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 
         आपल्या देशात पैशाचे लोभी, फितूर व सत्तालोभी नमक हराम यांची कमी नाही. काही फितुरांनी शूरचंद्र, थंगाल व टिकेंद्रजीत सिंहाचा पत्ता  इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितला.  त्यांनी मोठे सैन्य पाठवून या तिघांनाही अटक केली व  13 ऑगस्ट 1891 रोजी तिघांनाही फाशी देण्यात आली.
        मणिपूरचे  उदाहरण हे इंग्रजांच्या कुटिल कारवायांचे व गुंडगिरीचे दुर्दैवी दर्शन आहे,  यात शंकाच नाही.  टिकेंद्रसिंहाची  विधवा पत्नी कशीतरी मथुरा-वृंदावन ला पोहोचली व दारिद्र्यात आपले उर्वरित आयुष्य व्यथित मनाने घालू लागली. उतारवयात ती आंधळी झाली तेव्हा तिचे किती हाल झाले असतील व तिचा अंत कसा झाला असेल हे सांगता येत नाही. त्या देशातील एकही सतीचा लाल तिच्या मदतीसाठी पुढे आला नाही, हे केवढे दुर्दैव ...!!

             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏  *विनम्र अभिवादन*🙏💐                                      
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा