*🇧🇴*🇧🇴स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव....हर घर तिरंगा*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*15 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
🧩 *सोमवार* 🧩
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
💥 *भारतीय स्वातंत्र्य दिन*
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
🌍 *घडामोडी* 🌍
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
👉 *1988 - पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्लावरून केलेल्या भाषणानंतर मिले सुर मेरा तुम्हारा हे गाणे दुरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले*
👉 *1982 - भारतात रंगीत दुरचिञवाणीच्या प्रसारणास सुरवात झाली*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🌍 *जन्म*
👉 *1947 - राखी चिञपट अभिनेञी यांचा जन्म*
👉 *1929 - उमाकांत निमराज ठोमरे साहित्यीक, अनेकांना लिहिते करणारे वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक बालसाहित्यकार यांचा जन्म*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🌍 *मृत्यू*
👉 *2004 - अमरसिंग चौधरी गुजरात चे मुख्यमंत्री यांचे निधन*
👉 *2005 - भारतीय त्वचाशास्ञज्ञ आणि शैक्षणिक बॅडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*भारतीय स्वातंत्र्य दिन*
*(स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव)* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
भारतीय स्वातंत्र्यदिवस
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
🇧🇴 *इतिहास*
इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.
🇮🇳 *स्वतंत्र भारत*
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.
🏰 *स्वातंत्र्य दिनाचा उत्सव*
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.
🇮🇳🏺🇮🇳 *अमृत महोत्सव*
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ सा ली देशभरात साजरा होत आहे. या दिवसाचे विशेष औचित्य साधून देशभरात विविध सामाजिक, ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक कार्यक्रम आहे,( ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.
🔆 *स्वरूप*
भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.
औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील.
भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील ठाणे शहरात अमृत महोत्सवाची स्वतःची संकल्पना तयार केली आहे, जी १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. या उत्सवांमध्ये प्रत्येक राज्यातील विविध शहरात विविध कार्यक्रम, उत्सव, विविध रॅली, सामुदायिक कार्निव्हल इत्यादींचा समावेश आहे. ३१ जुलै २०२२ रोजी 'मन की बात' मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपले सोशल मीडिया प्रोफाइल चित्र बदलून भारताच्या ध्वजासह लावण्याचे आवाहन केले आहे.
🌀 *विविध उपक्रम*
२००७ साली लाल किल्ला येथील समारोह
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या आधी शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभातफेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीप्र गीत गायन, युवकांसाठी 'बढे चलो' अभियान असे विविध उपक्रम घेऊन देशाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी घेतली जात आहे.
धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे , कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला आहे.
मोठी शहरे तसेच लहान गावांमध्ये रोषणाई, आतषबाजी,वैचारिक व्याख्याने, स्पर्धा,ध्वजवंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यलढयाचा इतिहास माहिती होण्यासाठी विविध संग्रहालये, अभिलेखागार यांनीही प्रदर्शनाचे सादरीकरण करून जनतेला माहिती देण्याचा उपक्रम राबविला आहे.
🇮🇳 *हर घर तिरंगा अभियान*
भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.
🗺️ *भारताबाहेर*
भारत देशाच्या बाहेर असलेल्या विविध देशातील भारतीय दूतावास तसेच भारतीय नागरिक यांनी या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत स्थानिक पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संगीताचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, चित्र प्रदर्शन अशा विविध माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे.
📚 *संबंधित पुस्तके*
ते पंधरा दिवस.. : १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या, भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा (लेखक - प्रशांत पोळ)
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा