17 AUGUST DINVISHESH


🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*17 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
🧩 *बुधवार* 🧩


     🌍 *घडामोडी* 🌍    
 🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
👉 *1997 - उस्ताद अली अकबर खाॅ यांना अमेरिके चा नॅशनल हेरिटेज पुरस्कार जाहीर झाला*         
👉 *1982 - पहिली सी.डी.(COMPACT DISK)जर्मनीमध्ये विकण्यात आली*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🌍 *जन्म*
👉 *1949 - निनाद बेडेकर इतिहास संशोधक यांचा जन्म*
👉 *1932 - व्ही एस. नायपाॅल नोबेल पारितोषिक विजेते ञिनिदादी भारतीय लेखक यांचा जन्म*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🌍 *मृत्यू*
👉 *1988 - मुहम्मद झिया उल्लेख हक पाकिस्तान चे 6 वे राष्ट्रपती  यांचे निधन*
👉 *1909 - भारतमंञ्राचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना देण्यात आली यांचे  निधन*
 🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴                                   
   
*सुविचार:समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.*                                                                                              🇳🇪 
 *राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,भारताचे संविधान ,प्रार्थना* 🧘🏻‍♀️     
🇧🇴     
    *🥇सामान्य ज्ञान 🥇*
🇧🇴 🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

*👉जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश कोणता?*
*🥇जपान*

*👉नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?* 
*🥇दख्खनचे पठार*

*👉 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?* 
*🥇नदीचे अपघर्षण*

*👉दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?* 
*🥇लीगनाईट Lignite*                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     👩‍💻 *बोधकथा* 👨‍💻.                                                                                                     
  🛑 *कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको*🛑  
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते. त्यात तो सापडला.*
  🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮                                                                                                 *ठळक घडामोडी*
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
■ *महाराष्ट्र राज्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या 34% देण्याच्या विचारात.*
■ *अभिमानस्पद! आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलिमंजारो शिखरावर लातूरच्या तरुणाने 75 फूट तिरंगा फडकवला*
■ *खिशाला झळ! दूध महागलं, अमूल डेअरीकडून दूध विक्रीच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ, उद्यापासून नवीन किंमतीमध्ये विक्री*
■ *राज्याला पावसानं झोडपलं; मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा*
■ *आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचं निलंबन, 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतलं*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन* 
*9860214288*


🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
*⚜️ आझादी का अमृत महोत्सव ⚜️*
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴               संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      

🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
        
            *मदनलाल धिंग्रा*

     *जन्म : १८ सप्टेंबर १८८३*
(अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)

    *फाशी : १७ ऑगस्ट १९०९*
(पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
                होमरूल लीग
धर्म : हिंदू
प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

                  मदनलाल धिंग्रा  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

🕺 *सुरुवातीचे जीवन*
            त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

👬 *सावरकरांशी संबंध*
           मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

🔫 *कर्झन वायलीचा खून*
                   ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.

🕯 *शेवटचे वक्तव्य*
           फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."

💎 *नाटक*
            मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷
                 
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा