25 AUGUST DINVISHESH


*25 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरवार* 🧩
 
 
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2001 - सरोद वादक अमजद अली खाॅ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहिर*         
👉 *1998 - एन्सायक्लोपीडीया ब्रिटानिया या जगप्रसिद्ध विश्र्वकोशाच्या आयातीकर भारत सरकारने बंदी घातली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

👉 *1994 - भारतीय लेखक आणि कांदबरीकार काजोल आयकट यांचा जन्म*
👉 *1941 - अशोक पत्की  संगीतकार  यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2013 - भारतीय गायक व गीतकार रघुनाथ पाणिग्रही  यांचे निधन*
👉 *2012 - चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
*GENERAL KNOWLEDGE*
◆ Which colour symbolises peace?
Ans. :  *White*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  *👉हिन्दी दिवस केंव्हा असतो?*
*🥇14 सप्टेंबर*

*👉श्री परशुराम मंदीर कोणत्या ठिकाणी आहे?*
*🥇चिपळून*

*👉आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?*
*🥇धुळे , नंदुरबार*

*👉ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले पहिले महाराष्ट्र निवासी कोण आहे?*
*🥇वि.स.खांडेकर*

*👉365 दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?*
*🥇सौरवर्ष*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢टोलवसुलीसाठी पुन्हा नवी पद्धती येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा…*
*📢विधी मंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले, धक्काबुक्कीही झाली, विधी मंडळाच्या पायऱ्यांवर रणकंदन!*
*📢साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा; संगीता बर्वे यांना 'पियूची वही' कादंबरीसाठी पुरस्कार*
*📢बिहारमध्ये CBI अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, 24 ठिकाणी छापेमारी; RJD चे चार नेते रडारवर.*
*📢वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाखांची मदत, मुनगंटीवार यांचा निर्णय*
*📢अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर बाधित, 138 जणांचा मृत्यू, विदर्भ, मराठवाड्याला मोठा फटका*
*📢राज्यात 1913 रुग्ण, 1685 कोरोनामुक्त तर देशामध्ये 10,649 कोरोनाबाधित रुग्ण*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◎◑✹★✹🔅✹★✹◑◎

        *STORY TELLING*

*The Lion and the Mouse*

A lion was once sleeping in the jungle when a mouse started running up and down his body just for fun. This disturbed the lion’s sleep, and he woke up quite angry. He was about to eat the mouse when the mouse desperately requested the lion to set him free. “I promise you, I will be of great help to you someday if you save me.” The lion laughed at the mouse’s confidence and let him go.

One day, a few hunters came into the forest and took the lion with them. They tied him up against a tree. The lion was struggling to get out and started to whimper. Soon, the mouse walked past and noticed the lion in trouble. Quickly, he ran and gnawed on the ropes to set the lion free. Both of them sped off into the jungle.

*Moral of the Story :*
A small act of kindness can go a long way.

➖➖➖➖➖➖➖➖➖

  *SPECIAL INTRODUCTION*
[Indian World Recordist]

*Amjad Ali Khan*

Amjad Ali Khan was born in 1945 in Gwalior, one of the great cities of Madhya Pradesh, India. It is famous as the home of Miyan Tansen (c.1500-1590), one of the seminal figures in Indian music and a court musician to Akbar, the greatest of the Moghul emperors for the arts and culture. The holy tamarind tree by Tansen's tomb is said to convey special musical powers and, no doubt, Amjad Ali Khan's family have been regular devotees.

Amjad Ali Khan gave his first recital at age six. His musical heritage combines his illustrious family heritage of sarod playing with the tradition of instrumental music from Tansen and his disciples.

A recent biography contains a gallery of photos of Amjad Ali Khan with an astonishing array of personalities — from His Holiness the Dalai Lama to Diana Princess of Wales, from Yehudi Menuhin to Nusrat Fateh Ali Khan. He’s received a huge number of awards, but unlike many of the other Indian musicians who’ve become famous in the west – Ravi Shankar and Zakir Hussain, for example – he’s stuck to Indian classical music and hasn’t really been involved in fusion projects. For Amjad Ali Khan, his music is a serious art that deserves time and respect. He’s the sixth generation sarod player in his family, and his ancestors have developed and shaped the instrument over two hundred years.

He learned from his father Haafiz Ali Khan, who was a court musician in Gwalior up until Independence in 1947. And, in turn, Amjad Ali Khan has taught his two sons Amaan and Ayaan, born in 1977 and 1979, respectively, who are starting out on their own solo careers. You could say it’s my family instrument, he says with justifiable pride. Whoever is playing the sarod today learned directly or indirectly from my forefathers.

The instrument is a refined version of the Afghan rubab, a folk instrument which still dominates Afghan music today. It was Amjad Ali Khan’s great great great grandfather, Mohammad Hashmi Khan Bangash, who brought the rubab to India about 200 years ago. It was his descendants, notably his grandson Ghulam Ali Khan Bangas, who became a court musician in Gwalior, and who gradually transformed the rubab into the sarod we know today. The predominantly woody, staccato sound of the rubab was developed into a more lyrical sound, with notes that sustained, and one of the major instruments of Indian classical music was born.

Amjad Ali Khan has played at WOMAD festivals in New Zealand and the UK, with a memorable late-night Siam Stage session with cellist Matthew Barley. For the Real World recording Moksha, he tried something quite new for him and very unusual in the Indian classical music tradition.

➖➖➖➖➖➖➖➖➖
               *PASAYDAN*
                 *SILENCE*
*All students will keep silence for two minutes.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*MILIND WANKHEDE*
*HEADMASTER*
*PRAKASH HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KANDRI MINE*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
🏇🤺🚩🇮🇳👸🏻🇮🇳🚩🏇🤺 

         *मेवाड ची राणी*
      *पद्मिनी उर्फ पद्मावती*

          जन्म : --------
          मृत्यू : 25 आॕगष्ट 1303

जन्म : सिंहल द्वीप 
निधन : चित्तौड़
जीवनसाथी : राजा रत्न सिंह
वडिल  : राजा गंधर्व सेन 
आई : रानी चंपावती 
धर्म : हिन्दू

        राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, असे सांगितले जाते. मलिक मोहम्मद जायसी याने इ.स. १५४०च्या सुमारास तिच्यावर अवधी भाषेत पद्मावत नावाचे महाकाव्य लिहिले होते. या महाकाव्याने पद्मावती नावाच्या काल्पनिक पात्राला जन्म दिला. पद्मावतीचे नाव इतिहासात सापडत नाही.

सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका, सासरा आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणार्‍या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन, त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून, त्यानंतर आपले भाऊ व साल्यांचे मुडदे पाडून २१ ऑक्टोबर १२९५ रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला. सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दीनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करुन लूट मिळवण्याचे सत्र सुरू केले. चित्तोड(१३०३), गुजराथ (१३०४), रणथंबोर (१३०५), माळवा(१३०५), सिवाना(१३०८), देवगिरी(१३०९), वरंगळ (१३१०), जालोर(१३११), द्वारसमुद्र(१३११) आदि राज्यांवर आक्रमणे करुन अल्लाउद्दीनने परमार, वाघेला, चामहान(चौहान), यादव, काकाटीय, होयसाळ, पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला, लाखोंचे धर्मपरिवर्तन केले, कोट्यवधींचीया संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि अगणित हिंदुस्तानी माताभगिनींचा शीलभंग करून त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले. इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहितानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दीन व त्याच्या सैनिकांनी केले.

अल्लाउद्दीन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती. आणि रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती. सिंहली(श्रीलंकेचा) राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रुपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपुण होती. तिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल.आणि असे म्हणतात की तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे. तर असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले. रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रूपासाठी त्याकाळी जगविख्यात होते.
              रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राण्याने राघव चेतनला अपमानित करून दरबारातून हाकलून दिले. सूडाग्नीने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका वनात जाऊन बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे. एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरू केले. बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दीनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करून सांगितले की, "तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे", हे ऐकून खिलजीच्या व्यभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली. आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303 मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला. राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते. तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की, "मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले, तर मी दिल्लीला निघून जाईन." प्रजाहितास्तव राण्याने हे मान्य केले. परंतु यामागील कुटिल डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे, असे सुचविले. त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला. 'अतिथी देवो भव' या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव (परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे जी आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली 'सद्गुणविकृती' ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करून खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,"राणा जिवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा."

गडावर सैनिकी खलबते झडली. आणि गडावरून निरोप गेला की,"राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दीनच्या डेऱ्यात दाखल होईल, पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे." ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेऱ्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली. राणा रतनसिंहाला मोकळे करून घोड्यावर बसवण्यात आले. पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला. आणि....आणि हे काय? क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या. राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेऊन आणि त्याचा पुतण्या बादल (ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे). काही निवडक सैनिकांना घेऊन स्त्रीवेश धारण करून खिलजीच्या डेऱ्यात घुसले होते. काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरू झाली. गोरा तर खुद्द अल्लाउद्दीनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले. स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले. आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राण्याला घेऊन झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.

आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला. काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले. २५ ऑगस्ट १३०३ रोजी गडाचे दरवाजे उघडून, 'जय एकलिंग,जय महाकाल' चे नारे देऊन राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली. परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला. दहा-दहा सुलतानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत मृत्युमुखी पडला..लढाई संपली. राण्यासहित सर्व राजपूत मारले गेले. अन् वखवखलेले सुलतानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार, म्हणून गडात घुसले.

पण गडावर शिरताच पाहतात तर काय, एकही स्त्री दिसेल तर शपथ. थोडे पुढे जाऊन चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध 'विजयस्तंभ' ओलांडल्यावर लागणाऱ्या विस्तीर्ण मैदानावर, जिथे आज 'जौहर स्थल' म्हणून पाटी लागलेली आहे, तिथे राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते, त्याच अग्नीत उड्या घेतल्या. स्वतःच्या शीलाचे व देव, देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका आगीत जळून भस्म झाल्या..तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवले, पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.

लढाई संपल्यावर सुमारे ३०,००० निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दीनने कत्तल केली, असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवले आहे.

ता घटनेवरचा महाराणी पद्मिनी हा हिंदी चित्रपट इ.स. १९६४ मध्ये आला होता. त्यानंतर संजय लीला भन्साळीचा पद्मावत नावाचा हिंदी सिनेमा २०१८ साली 'पद्मावती' चित्रपटगृहांत लागला.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *स्वदेशप्रेम, स्वधर्मप्रेम व स्वाभिमानाने जोहर करणा-या भगिनींना विनम्र अभिवादन* 🙏
                                                                                                                                                                                                                                          ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा