*3 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
🧩 *बुधवार* 🧩
💥 *क्रांतीसिंह नाना पाटील जयंती*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2004 - राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले 1 ऑगस्ट 2004 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली होती*
👉 *2000 - मल्याळी दिग्दर्शक शाजी एन.करूण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस ॲड लेटर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1924 - लिऑन युरिस- अमेरिकन कांदबरीकार यांचा जन्म*
👉 *1916 - शकील बदायुॅनी - गीतकार आणि शायर यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *2007 - सरोजिनी वैघ - लेखिका यांचे निधन*
👉 *1993 - स्वामी चिन्नयानंद सरस्वती अध्यात्मिक गुरु यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश कोणत्या समुद्रात आहे?*
*🥇 बंगालचा उपसागर*
*👉भारतातुन कोणता आजार हा समुळ नष्ट झाला आहे?*
*🥇पोलिओ*
*👉भारत देशातील संसदगृहाचे नाव काय आहे?*
*🥇संसद*
*👉पणजी या शहराचे जुने नाव काय होते?*
*🥇पंजीम*
*👉लोकमान्य टिळकांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन कार्य केले?*
*🥇गितारहस्य*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*💎हिर्यापेक्षा जनता महत्वाची👥👥*
*एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला,''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''*
*🧠तात्पर्य :-*
*आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*📢आशिया चषक 2022 चे वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी फायनल*
*📢'अल कायदा'चा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, काबूलमध्ये गृहमंत्र्याच्या घरात लपलेला जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9760214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा