*देशभक्ती गीतगायनात साक्षी दोंदलकर हिचा व्दितीय क्रमांक*
रामटेक - शिक्षण विभाग पंचायत समिती रामटेक तर्फे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज (ता १६) किमंतकर सभागृह येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार ॲड. आशिष जायस्वाल, जि. प. सदस्य शांताताई कुमरे, जि. प. सदस्य श्री हरिश उईके, जि. प. सदस्य श्री संजय झाडे, जि. प. सदस्य श्री दुधाराम सव्वालाखे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती संगीता तभाने, श्रीमती शालिनी रामटेक, श्री उईके उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमातील देशभक्ती गीतगायनात दिव्यांग गटात प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथील कु साक्षी धर्मराज दोदंलकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तिला बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचे प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईनचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे, वडील श्री धर्मराज दोदंलकर, श्री श्याम गासमवार, श्री विजय लांडे, श्री अशोक नाटकर, श्री प्रशांत सरपाते, श्रीमती महानंदा इळपाते, श्रीमती कामिनी पाटील, श्रीमती सुचिता बिरोले, श्रीमती अनिता खंडाईत, श्रीमती ज्योत्सना मेश्राम, श्री मिलिंद वाघमारे, श्री प्रभाकर खंडाते, श्री ठकराले बाबु सह पालकांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा