शिक्षणासाठी एक हात मदतीचा


*शिक्षणासाठी एक हात मदतीचा*
🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲


नागपूर ग्रामीण पोलीस व्दारा आयोजित जिल्हातील गाव पातळीवरील दुर्गम भागातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना सायकल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नागपूर व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी बहुल भागातील प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कान्द्री-माईन येथील वर्ग ६ मध्ये शिकत असलेल्या कु राणी मेश्राम हिला सायकल भेट देण्यात आली. शिक्षणात खंड पडू नये यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे, शिक्षक श्री प्रशांत सरपाते, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरचे विभागीय सचिव श्री खिमेश बढिये यांनी कौतुक केले.


1 टिप्पणी: