गरजवंताना नोटबुक वितरण व बक्षिस वितरण




*नोटबुक वितरण व बक्षीस वितरण*
प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कांन्द्री माईन विद्यालयांमध्ये रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक तर्फे शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी वरिष्ठ लिपिक श्री. चौकसे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे सर तसेच रविकांत रागिट प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. नेवारे सर आणि श्री. मिराशे सर उपस्थित होते.
   
                                                             या 
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नोटबुक वितरण करण्यात आले तसेच शाळेतील इयत्ता 12 वी ला असलेली विद्यार्थिनी कुमारी. साक्षी दोंदलकर या विद्यार्थिनीने तालुका स्तरीय वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कामिनी सौ. कामिनी पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री. प्रशांत सरपाते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक श्री. गासमवार सर, श्री. नाटकर सर, श्री. लांडे सर सौ. बिरोले मॅडम, सौ. कुमरे मॅडम सौ. अनिता खंडाईत व श्री. प्रभाकरजी खंडाते,मिलिंद वाघमारे, ठकराले व शाळेतील सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा