#HarGharTiranga धर्मराज प्राथमिक शाळेच्या "भारत माता की जय" च्या घोषणेने दुमदुमली कांद्री नगरी


धर्मराज प्राथमिक शाळेच्या "भारत माता की जय" च्या घोषणेने दुमदुमली कांद्री नगरी

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#HarGharTiranga
कन्हान - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने "सन्मान तिरंगा" जनजागृती रॅली आज (ता ८) कांद्री नगरात काढण्यात आली.
धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चवथी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय चा जयघोष करीत जनजागृती रॅली काढली. या रॅलीला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी हिरवा झेंडा दाखविला. अत्यंत शिस्तबद्ध रितीने चिमुकल्यांनी भारत माता की जय, हर घर तिरंगा, तिरंगे की रक्षा कोन करेंगा हम करेंगे हम करेंगे या घोषणा देत कांद्री गावात प्रभातफेरी काढली.



गांधी चौकात जनजागृती रॅलीचे ग्रामपंचायत कांद्री तर्फे सरपंच श्री बलवंत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच श्री बलवंत पडोळे, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शाळेच्या वतीने श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी प्रास्ताविक करुन रॅलीच्या आयोजनाची भूमिका विशद केली. सरपंच श्री बलवंत पडोळे यांनी चिमुकल्यांचे कौतुक करीत सर्वांनी "हर घर तिरंगा" हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने या उपक्रमांतर्गत व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून प्रत्येक पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार श्री राजू भस्मे यांनी मानले. कांद्री ग्रामपंचायतच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले.



यावेळी उपसरपंच श्री बबलू बर्वे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री शिवाजी चकोले, श्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री राहूल टेकाम, श्री प्रकाश चाफले, श्री धनराज कारेमोरे, सौ आशा कनोजे, मोनाली वरले, श्री महेश झोडावणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री विधिलाल डहारे, सौ स्वाती गि-हे, गणेश सरोदे यांच्यासह मोठय़ा संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. जनजागृती रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री राजू भस्मे, सौ चित्रलेखा धानफोले, कु हर्षकला चौधरी, कु शारदा समरीत, कु अर्पणा बावनकुळे, सौ सुनीता मनगटे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा