NT DNT SEED भटक्या विमुक्तांसाठीचे SEED पोर्टल पूर्ववत सुरू


भटक्या विमुक्तांसाठीचे SEED पोर्टल पूर्ववत सुरू
नोंदणी करून लाभ घ्यावा


केंद्र सरकारने पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या वतिने केंद्रिय भटके विमुक्त विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांच्या प्रयत्नाने भटके विमुक्तांसाठी ४ योजना चालू केल्या आहेत. मधल्या काळात काही तांत्रिक अडचणीमुळे हे पोर्टल बंद होते. ते आता वापस चालू झाले आहे.


१).प्रधानमंत्री आवाज योजना(भटके विमुक्त).

२).प्रधानमंत्री जनआरोग्य योजना/आयुष्यमान भारत(भटके विमुक्त).

३).मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस.(UPSC/MPSC/NEET etc.)

४).उपजीविका.

केंद्रिय भटके विमुक्त विकास व कल्याण बोर्ड,सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येणार आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे.
सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त भटके विमुक्त समाजबांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. खासकरुन मोफत शिकवणी वर्ग(Free Coaching) या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.


*👉🏻For Registration click to the below link for scheme to enrol it only for DNT, NT & SNT.*


*👉🏻 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

१).ईमेल आयडी असावा आणि बँक लिंक असलेला मोबाईल नंबर.
२).आधार कार्ड.
३).जात प्रमाणपत्र.
४).उत्पनाचा दाखला(२.५ लाख पेक्षा कमी)
५).बँक पासबूक(Acc.No & IFSC Code) दर्शविणारे पान अपलोड करायचे आहे.


—हे अपलोड झाल्यानंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर आपला UID नंबर तयार होईल तो जपून ठेवावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा