Scholarship बालसंगोपन योजना


बालसंगोपन योजना


ज्या मुलांचे आई किंवा वडील मरण पावले असतील. म्हणजेच एकल पालक असलेल्या व आई वडील या दोघांचेही निधन झालेल्या म्हणजे निराश्रित बालकांसाठी महिला व बालकल्याण विभागाची बालसंगोपन योजना कार्यान्वित आहे. ही योजना अत्यंत गरजू व आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या मुलांनाच लागू होते. ही योजना संबंधितांना देय करण्यापूर्वी संबंधित जिल्ह्य़ातील महिला व बालकल्याण समितीच्या वतीने तपासणी करण्यात येते.



या योजनेंतर्गत दरवर्षी पात्र बालकांना दरमहा ११०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.


आवश्यक कागदपत्रे
१) मुलाच्या /मुलीच्या जन्माचा दाखला
२) आई / वडील किंवा आईवडील दोघेही ह्यात नसल्याचे प्रमाणपत्र व मृत्यू दाखला
३) एकल पालकाच्या उत्पन्नाचा दाखला
४) पालकांचा मुलासोबत घरासमोरील फोटो
५) रहिवासी दाखला
६) आई वडील यांनी मुलांचा त्याग केला असल्यास नगरसेवक, सरपंच यांचे प्रमाणपत्र किंवा पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीची प्रत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा