*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा*
रामटेक - कांद्री माईन येथील प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे कान्द्री माॅयल लिमिटेड तर्फे आयोजित 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत 'शाळा स्तरावर पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला वर्ग 5 ते 10 च्या सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात 60 विद्यार्थी सहभागी झाले. यातील 20 विद्यार्थ्यांना प्रथम, व्दितीय व तृतीय विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त *घर घर तिरंगा* या विषयावर श्री ललित अरसडे (माॅईल कार्मिक अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माॅयल चे कार्मिक अधिकारी श्री ललित अरसडे, फुटबॉल खेळाडू श्री रेमंड फ्रान्सिस, शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे, ज्येष्ठ शिक्षक श्री श्याम गासमवार उपस्थित होते. ललित अरसडे यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षण घ्यावे, स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कामिनी पाटील यांनी तर आभार श्री प्रशांत सरपाते यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी श्री विजय लांडे, श्री अशोक नाटकर, सौ महानंदा इळपाते, सौ सुचिता बिरोले, कु ज्योत्सना मेश्राम, सौ अनिता खंडाईत, श्री ठकराले, श्री प्रभाकर खंडाते व श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले. यावेळी मोठय़ा संख्येने पालक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा