*अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती*
(शिष्यवृत्ती रक्कम - १८५० रुपये)
*आवश्यक कागदपत्रे*
१) सरपंच /सचिव यांच्या संयुक्त सहिचे, ज्या शासकीय काम करीत असेल त्या प्रमुखांच्या सहीचे अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे पालकाचे प्रमाणपत्र
२) विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स
३) विद्यार्थ्यांचे बॅक अकाउंट खाते व लिंक पावतीची झेरॉक्स
४) मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स
५) राशन कार्डची झेरॉक्स
६) प्रतिज्ञापत्र (२० रुपयांची कोर्ट स्टॅम्प लावलेले)
*अस्वच्छ व्यवसायाची यादी*
जनावरांची कातडी सोलणे
कातडी कमावणे
कागद, कचरा गोळा करणे
मैला साफ करणे व यासारखी इतर अस्वच्छ व्यवसायाची कामे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा